खासगी दवाखान्यात या लसी साठी आकारले जातात १५०० ते २००० रुपये ; सर्व सामान्य नागरिक आणि शेतमजूर अडचणीत असताना शासनाने दिलासा द्यावा……..सचिन बोगावत
भिगवण वार्ताहर.दि. १७
लहान मुलांना कोरोना पासून संरक्षण मिळावे यासाठी इन्फ्लुझा लस प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मिळावी अशी मागणी सचिन बोगावत यांनी केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत आल्याचे रुग्णांच्या आकड्या वरून दिसून येत असतानाच याविषयातील तज्ञांनी आणि सरकारने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. या तिसऱ्या लाटेचा विशेष करून लहान मुलांना धोका असल्याचे भाकीत करण्यात येत आहे. यासाठी लहान मुलांना इन्फ्लूझां लस देण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे. ही लस प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळत नसल्याने यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे. त्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असताना आणि कोरोनाच्या महामारी मुळे हाताची कामे गेली असताना ही खासगी दवाखान्यात १५०० ते १८०० रुपयांना मिळणारी लस घेण्यासाठी रक्कम जमा करणे सर्व सामान्य नागरिक आणि गरीब शेतमजूर यांना शक्य नाही. त्यामुळे ही लस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून मोफत देण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आणि भारतीय जैन संघटना पुणे अध्यक्ष सचिन बोगावत यांनी केली आहे.याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन बोगावत यांनी कोरोनाच्या काळात कोविड योध्या चे काम करीत अनेक सामाजिक संस्था ,रोटरी क्लब आणि भारतीय जैन संघटना मदतीतून रुग्णांच्या बेड पासून त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविल्या आहेत.तसेच प्लाझ्मा , रक्तदान ,रुग्णांच्या बेडसाठी संपर्क आणि बिलाबाबत अडचणीत मदत करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले गेल्याचे पहावयास मिळाले.
तर खासदार सुप्रिया सुळे ,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी थेट संपर्कातील सामाजिक कार्यकर्ते असले मुळे बोगावत यांची मागणी मान्य होती का ? हे पाहणे गरजेचे आहे.