इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर ;अनेक उपायोजना करूनही आलेख वाढताच

0
386

पोलीस प्रशासन , आरोग्य विभाग आणि महसूल विभाग २४ तास काम करूनही आलेख खाली येत नसल्यामुळे हतबल होत असल्याचे वास्तव ….

भिगवण वार्ताहर.दि.३

सत्यवार्ता कोरोना अपडेट:—-

इंदापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत असून आज अखेर ग्रामीण भागात १०३१९ तर शहरी भागात १८९६ रुग्ण संख्या नोंदवली.तर आज ग्रामीण भागात १७९ नवीन रुग्णांची भर पडली तर शहरी भागात २९ नवीन रुग्णांची भर पडली.त्यामुळे १ महिनाभर निर्बंध पाळूनही नवीन रुग्णांच्या संख्येत कमी येत नसल्याने प्रशासनापुढे चिंतेचा विषय झालेला आहे.इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात आजच्या दिवशी १०४९८ तर शहरी भागात १९२५ एकूण रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

तर आता पर्यंत या आजारातून बरे होत घरी सोडलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या काल अखेर ७७०१ इतकी आहे.तर आज २४८ ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.तर शहरी भागातील १५५७ जणांना काल अखेर ४६ जणांना आज उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.उपचारादरम्यान मयत झालेल्यांची संख्या ग्रामीण भागात काल अखेर १९७ तर आज १० जणांचा यात मृत्यू झालेला आहे.शहरी भागात काल अखेर १० रुग्णांचा मृत्यू झाला असून आजचा दिवस शहरी भागासाठी नशिबवान ठरला कारण आज शहरी भागात एकही जन दगावलेला नाही.ग्रामीण भागातील मृत्यूचे प्रमाण १.९७ इतके असून शहरी भागातील प्रमाणही १.९७ इतकेच आहे.

ग्रामीण भागातील कोविड सेंटर मध्ये २३४२ अॅकटीव रुग्ण उपचार घेत असून शहरी भागात २८४ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण वाढ पाहता होम आयसोलेशन बंद करून शासकीय विलगीकरण कक्ष निर्माण करणे गरजेचे झाले आहे याकडे प्रशासन आणि ग्रामपंचायता आणि सामाजिक संस्थानी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here