दिलेला शब्द पाळला ; भिगवणकरांसाठी नवीन पाईप लाईन

0
774

जुने भिगवण पासून मंगलदृष्टी पर्यंत नवीन पाईप लाईन..

वार्ड २ ,३ आणि ४ या वार्डचया नागरिकांना होणार फायदा पाणी प्रश्न काही अंशी सुटण्यास होणार मदत…

भिगवण वार्ताहर . दि.२

भिगवणकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जुने भिगवण गाव ते मंगलदृष्टी इथपर्यंतची पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती सरपंच तानाजी वायसे यांनी दिली. १ मे या कामगार दिनापासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आल्याने पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांची यातून सुटका झाल्याचे पहावयास मिळाले .

भिगवण गावची लोकसंख्या दिवसंदिवस वाढत असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.प्रत्येक उन्हाळ्यात मोठी टंचाई जाणवत होती .मात्र दूरदृष्टीचे राजकारण केले जात नव्हते त्यामुळे टंचाईचा सामना नागरीकांना आणि विशेष करून महिला वर्गाला करावा लागत होता.

नवीन झालेल्या पाइपलाइन मुळे भिगवणकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास फार मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. या नवीन पाइपलाइन मुळे जवळजवळ २ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची साठवण, टाकीत होणार असून त्यातील सुमारे १ लाख ७० हजार लि. पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे.या नव्याने झालेल्या पाइपलाइन मुळे विशेषतः येथील वॉर्ड क्र.२,३,व ४ मधील नागरिकांची पाण्याची समस्या सुटणार आहे.आणि वॉर्ड क्रमांक १ व २ साठीही स्वतंत्र पाणीपुरवठा होणार आहे.

सदर पाइपलाइन करता साधारणतः ८ लाख रुपये खर्च झाला असून याकरिता हरीश लुंड यांनीही आर्थिक मदत केली आहे.या नवीन पाइपलाइन मुळे गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे .निवडणुकीत दिलेला पाण्याचा आणि विकासाचा शब्द पाळला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी सरपंच तानाजी वायसे, उपसरपंच प्रतिनिधी पिंटू शिंदे,अशोक शिंदे, माजी सरपंच पराग जाधव, उपसभापती संजय देहाडे, हरीश लूंड, संजय रायसोनी,तुषार क्षीरसागर,जयदीप जाधव,दत्ता धवडे, जावेद शेख,कपिल भाकरे, सत्यवान भोसले, गुराप्पा पवार, रुपेश क्षीरसागर, मच्छिंद्र खडके, काळे व ग्रा. प. कर्मचारी उपस्थित होते.

” यावेळी आम्ही राजकारण करण्याऐवजी विकास कामांना प्राधान्य देणार असून, इतरांप्रमाणे फक्त विकास कामांच्या नुसत्या वल्गना करणार नाही तर ते करून दाखवणार आहोत.” भिगवण कर जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये , चांगले रस्ते मिळावेत आणी त्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी भविष्यातही अनेक विकासकामे मार्गी लावणार असल्याचे सरपंच तानाजी वायसे माजी सरपंच पराग जाधव आणि पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here