भिगवण वार्ताहर.दि.३०
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारवाडी उपकेंद्रात ४५ वर्षाच्या पुढील २३३३ नागरिकांपैकी १८४८ नागरिकांचे लसीकरण पहिल्या टप्प्यात झाल्याचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी सांगितले.तर १५० च्या आसपास नागरिकांना दुसरा डोस हि देण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तक्रारवाडी उपकेंद्रात मदनवाडी आणि पोंधवडी अशी तीन गावे येतात.यात ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांची संख्या २३३३ इतकी आहे.उपकेंद्राच्या वतीने करण्यात येणारी जनजागृती आणि तीनही गावातील आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांच्या मुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले.तक्रारवाडी गावात सरपंच सतीश वाघ ,पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे यांनी लसीकरणाचा शुभारंभ केला.उपकेंद्राच्या बाहेर ग्रामपंचायत निधीतून मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती.तर नागरीकांना योग्य अंतर पाळून बसण्यासाठी खुर्च्या तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.मदनवाडी आणि पोंधवडी येथेही लसीकरणाचे कँम्प लावण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर , मदनवाडी गावच्या सरपंच आम्रपाली बंडगर , सदस्य तेजस देवकाते ,पोंधवडी गावचे सरपंच लक्ष्मण पवार , सदस्य गणेश पवार ,डॉ.तुळशीराम खारतोडे यांनी लसीकरणासाठी लागणाऱ्या सुविधा पुरवून नागरिकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन केले होते.
तर लसीकरण झाल्यानंतर कोणत्याही लाभार्थ्याला शारीरिक समस्या जाणवल्या नाहीत.तर एकालाही लसीकरणा नंतर दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागले नसल्याची माहिती डॉ.मृदुला जगताप यांनी दिली.
लसीकरण करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांना आरोग्य सहायका रेणुका जाधव ,आरोग्य सेवक शरद ससाणे ,आरोग्य सेविका उषा यादव ,सीमा मारकड ,मनीषा देवकाते ,ज्योती जगताप ,सविता देवकाते ,शोभा काळगे ,भारती बंडगर यांनी सहकार्य केले.
तक्रारवाडी उपकेंद्राच्या माध्यमातून लसीकरण सोबतच विविध असंसर्गजन्य आजार विषयक जनजागृती ,बीपी शुगर कॅन्सर तपासणी ,किशोरवयीन मुलींचे आरोग्य तपासणी नियमित केल्या जातात.तसेच तीन हि गावात आरोग्याबाबत नियमित सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती आरोग्य सेवक शरद ससाणे यांनी दिली.