कोवीड आढावा बैठकीला मंडल अधिकारी अनुपस्थित ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी

0
314

भिगवण वार्ताहर.दि.१८

इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना आजाराच्या आढावा घेण्यासाठी भिगवण कोविड सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी भिगवण मंडल अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढल्याचे दिसून आले.शांत आणि संयमी नेत्याचे हे रौद्र रूप पाहून बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सबंधित मंडलअधिकारी यांच्या अनुपस्थितितीची दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याने वातावरण निवळण्यास मदत झाली.

इंदापूर तालुक्यात कोरोणाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.अनेक उपाययोजना करूनही त्यावर अंकुश आणणे कठीण झाले आहे.त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आरोग्यविभाग , पोलीसप्रशासन , महसूलविभाग ,पंचायत समिती प्रशासन पदाधिकारी  तसेच नगरपालिका आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांची आढावा बैठक आयोजित केली होती.यावेळी सर्व विभागांना आपली जबाबदारी काटेकोर पणे पाळण्याचे आदेश राज्यमंत्री भरणे यांनी दिले.तर आढावा बैठकीत आलेल्या सुचनावर प्रशासनाकडून करण्यात येत असलेली उपाय योजना बाबत चर्चा केली.यावेळी महसूल विभागाचे बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे ,तहसीलदार अनिल ठोंबरे तसेच तक्रारवाडी ,मदनवाडी भिगवण विभागाचे तलाठी हजर होते.मात्र यावेळी मंडलअधिकारी दिसून आले नाहीत. राज्याचे मंत्री यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला वरिष्ठ पदाधिकारी हजर असताना मंडल अधिकारी अनुपस्थित असल्याने भरणे यांनी नाराजी व्यक्त केली.तर याबाबत योग्य दखल घेण्याची सूचना केली.

याबाबत मंडल अधिकारी मकरंद तांबडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण भिगवण येथील आढावा बैठकीला हजर असल्याचे सांगितले. तसेच बैठक आटोपल्यावर घरातील सदस्याला दवाखान्याच्या उपचार कामासाठी बारामती येथे गेल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here