राशीन येथील डॉक्टरची पत्नी आणि दोन मुलासह आत्महत्या ;मुलाच्या व्यंगामुळे उचलले टोकाचे पाऊल

0
1046

भिगवन वार्ताहर दि.२०

सामाजिक बांधिलकीची नाळ जोडलेल्या राशीन गावच्या प्रसिद्ध डॉक्टरने मुलाला ऐकू येत नसल्याच्या भावनेतून सहकुटुंब आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. दोन मुले आणि पत्नीसह डॉक्टर ने केलेल्या आत्महत्येमुळे राशिन गावावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राशीन येथील डॉक्टर महेंद्र थोरात ,वर्षा थोरात ,कृष्णा थोरात आणि कैवल्य थोरात अशी आत्महत्या केलेल्या डॉक्टर कुटुंब यांची नावे आहेत गरिबांचा डॉक्टर म्हणून ओळख असणारे डॉ.महेंद्र थोरात हे मूळ दगडी बारडगाव तालुका कर्जत येथील शेतकरी कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे त्यांचा राशीन येथे श्रीराम हॉस्पिटल नावाने वैद्यकीय व्यवसाय चालू होता. डॉक्टर थोरात यांना दोन मुले आहेत त्यातील कृष्णा नावाचा मुलगा लहानपणापासून कमी ऐकू येत असल्याचे आणि अनेक वेळा वैद्यकीय उपचार करूनही सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टर कुटुंबाची अपराधीपणाची भावना होत असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवत त्यांनी आपला जीवन प्रवास संपवला. पत्नी आणि दोन मुले यांना सलाईनद्वारे इंजेक्शन देवून डॉकटर महेंद्र यांनी गळफास लावून जीव दिला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी सकाळी रुग्ण तपासणीला आल्यावर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

अत्यंत संवेनशील आणि सामाजिक उपक्रमात अग्रक्रमाने भाग नोंदविणाऱ्या डॉकटर ने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे राशीन कर हळहळ व्यक्त करीत आहेत.तर पत्नीशी चर्चा आणि विचार विनिमय करूनच आपण हा निर्णय घेतल्याचे मिळालेल्या सुसाइड नोट मध्ये लिहण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here