कमळ फुलणार की घड्याळाची टिक.टिक ..सुरू होणार ; सर्वपक्षीय पॅनल मध्ये धुसपुस

0
757

भिगवण वार्ताहर . दि. ७

गावचा विकास करण्याच्या आणाभाका घेत सर्वपक्षीय युती करीत निवडून आलेल्या ७ सदस्या पैकी ४ सदस्यांनी १ सदस्यांच्या नातेवाईकसह सरपंच पदासाठी खेळी करीत गावातून देवदर्शनाचया नावाखाली सहलीला गेल्याची चर्चा तक्रारवाडी गावात सुरू झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराचे मानले जाते.मात्र मागील काही वर्षांपासून या गावात राष्ट्रवादी पक्षाने आपले कट्टर कार्यकर्ते यांना ताकद देत गावातील मतदानात आमूलाग्र बदल घडवून आणला असल्याचे दिसून आले आहे.राज्यमंत्री दतात्रय भरणे ,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने ,हनुमंत बंडगर यांच्या माध्यमातून काही विकास कामे केल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले.तरीही तक्रारवाडी हे गाव माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराचे मानले जात असल्याने दोन्ही पार्टीच्या सदस्यांनी आपले पक्ष बाजूला ठेवून एकत्र येत निवडणुक लढवीत ९ पैकी ७ जागांवर आपले बहुमत सिद्ध केले.मात्र सरपंच पदाची अपेक्षा आणि आपल्या नेत्याला दिलेला शब्द मोडला जावू नये यासाठी काही सदस्यांनी तडजोडीची बैठक घेण्याची तयारी करीत सदस्य फोडण्याची खेळी केली गेली.तर मतदारांनी विश्वासाने दिलेल्या मत दानाशी प्रतारणा करीत ४ सदस्यांना आणि १ नातेवाईकाला सोबत घेत देव दर्शनाच्या नावाखाली सहलीला गेेले
तक्रारवाडी गावातील इतिहासात ७ सदस्य निवडून येत ४ सदस्य बाहेर गावी गेल्याची घटना पहिल्यांदाच घडली असल्याचे ज्येष्ठ मंडळी बोलत आहेत.
४ सदस्यांनी देव दर्शनाला जाणे हे राष्ट्रवादी पक्षाला सरपंच पद मिळवून देण्यात महत्वाचे असले तरी मतदारांशी ही प्रतारणा ठरू नये .आणि गावातील एकीची बेकी ठरू नये अशीच अपेक्षा केली जात आहे.
आता राज्यमंत्री दतामामा भरणे तक्रारवाडी गावावर राष्ट्रवादी चां सरपंच बसविणार की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे गावावर आपली कमांड ठेवण्यासाठी काही हातखंडा अवलंबतात हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरेल.
असे असले तरी निवडून येताना विकासासाठी घेतलेल्या आणाभाका आणि ५ वर्ष साथ न सोडण्याचा शब्दाला सरपंच पदासाठी ८ दिवसात तिलांजली दिली जात असेल तर असे राजकारण समाजासाठी नक्कीच घातक ठरू शकते हे मात्र निश्चित..
मात्र सरपंच पदासाठी काय पण ही म्हण गावात चर्चिली जात आहे हे ही कमी नसे …….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here