भिगवन वार्ताहर…५
तक्रारवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय एकी करत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सरपंच पदांमुळे बेकि निर्माण झाले चित्र दिसून येत आहे. निवडून येत असताना बाजूला ठेवलेले पक्षाचे जोडे आता निवडीसाठी हातात घेण्यात येतात काय असा सवाल मतदारांना पडला आहे .
नुकत्याच पार पडलेल्या तक्रारवाडी गावच्या निवडणुकीत १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या पार्टीला हरविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत मोठ बांधली होती.यात सताधरी पार्टीकडून पद उपभोगणाऱ्या काही सदस्यांचा सुधा यात सहभाग होता.विकास कामे करताना जाणीव पूर्वक आपणाला बाजूला ठेवले जात असल्याचा आरोप करीत विरोधकांना एकत्र करीत सत्ताधारी मंडळीच्या विरोधात ही निवडणुक लढवली गेली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपचे तसेच विद्यमान राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे काही कार्यकर्ते गावचा विकास करण्याचा मानस ठेवत एकत्र येत जीवा भावाने ही निवडणूक लढले होते आणि अशक्य प्राय विजय प्राप्त केला.निवडणुकीच्या अगोदर झालेल्या आरक्षणात इतर मागास वर्गीय आरक्षण मिळाले असल्यामुळे सरपंच पदाचे चेहरे समोर करून ही निवडणुक लढली गेली.मात्र शासनाच्या दुसऱ्या आदेशाने हे आरक्षण रद्द करीत नव्याने आरक्षण काढण्यात आले आणि याचमुळे गावच्या विकासासाठी एकत्र आलेल्या सदस्यांमध्ये एकी ची बेकी झाल्याचे पहावयास मिळाले.चार दिवसा पूर्वी एकत्र राहण्याच्या आणा भाका घेणारे सदस्य आपणाला पहिले वर्ष सरपंच पद मिळाले पाहिजे यासाठी आग्रही राहिले.तर या वेळी चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत हमरी तुमरी होण्याची वेळ आली.यावेळी आपल्याच सदस्याला सरपंच पद मिळाले पाहिजे यासाठी प्रत्येक जण आग्रह करीत होता.यावेळी काही तर या निवडणुकीत कोणतीही भूमिका स्पष्ट न मांडणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी यावेळी मात्र चर्चा कशी मोडली जाईल याची काळजी घेतली.त्यामुळे एका दिलाने निवडून आलेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी आपले पक्ष उघड दाखविण्यास सुरवात केली.त्यामुळे आता सरपंच कोणाचा होणार राष्ट्रवादी चां की भाजपचा एवढेच पाहणे बाकी उरले आहे.गावच्या विकासासाठी मतदारांनी आपणाला मत दिले आहे हे सर्व सदस्य विसरून पदासाठी एकमेकाच्या विरोधात कट रचण्यासाठी इतर सदस्यांना आमिष दाखविण्यासाठी रात्र घालवू लागल्याचे दिसून येत आहे.तर विरोधक मात्र एका जागेवर बसून चाललेला बिन पैशाचा निवड तमाशा पाहत आहेत .
गावचे सरपंच पद निवडून आलेल्या चारही सदस्यांना मिळत असताना आपणाला पहिले पद मिळाले पाहिजे यातून होणाऱ्या कुरघोडी टाळण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसून आले नाही.तर सर्वपक्षीय गटात राहून गट फोडण्याचा मानस असणारे आनंदी होत असल्याचे दिसून आले.आता ९ तारखेला किती अर्ज दाखल होतात,विरोधक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.