पोंधवडी येथे दोन प्रकरणात ८ आरोपी विरोधात ऐट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल ; ग्रामपंचायत निवडणुकीचे उमटू लागले पडसाद

0
2026

भिगवण वार्ताहर.दि.१

पोंधवडी बंडगरवाडी येथील निवडणूक पार पडताच भिगवण पोलीस ठाण्यात लागोपाठ दोन दिवसात दोन अॅट्रासिटी आणि अपहरणासह लोकप्रतिनिधी अधिनियम कलमानुसार गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.दोन वेगवेगळ्या दाखल झालेल्या या गुन्ह्यात एकात ५ आरोपी असून दुसऱ्या गुन्ह्यात ३ आरोपी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर दोन्ही गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी कि फिर्यादी विनोद बाजीराव भोसले यास तु माझे पॅनलला मतदान करायचे ,तु जर मतदान केले नाही तर तुला माझ्या गावात राहू देणार नाही.तसेच तुझे अपहरण करून तुला जीवे मारून उजनी मध्ये टाकून देईन .अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करीत सोबत आणलेल्या चारचाकी वाहनात बळजबरीने बसवीत वरवड येथे नेवून पुन्हा मदनवाडी येथील गुरांच्या गोठ्यात बांधून ठेवल्यामुळे आरोपी विराज वसंत बंडगर वय २८ रा.मदनवाडी ,गणेश दतात्रय पवार वय ३५ रा.पवारवस्ती पोन्धवडी ,नारायण महादेव बंडगर वय.३५ ,अभिषेक ज्ञानदेव बंडगर वय.२७ प्रदीप मधुकर बंडगर वय ३२ रा.बंडगरवाडी पोंधवडी यांच्या विरोधात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी सुनील आप्पा पवार पोंधवडी यांनी माजी सरपंच नाना अर्जुन बंडगर ,नवनाथ बंडगर ,प्रेमकुमार बंडगर यांच्या विरोधात पोंधवडी येथील जमीन गट १०६ मध्ये शेतीची मशागत करीत असताना आरोपी यांनी आपली इन्होव्हा गाडी नंबर एम.एच.४२ ए एकस १००० मधून येत फिर्यादी याला या अगोदर हि शेतजमीन आम्ही विकत घेतली आहे.या जमिनी मध्ये पाय ठेवायचा नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करीत आपल्या सोबत आणलेली तलवार फिर्यादीच्या मानेवर ठेवीत लाथाबुक्यांनी मारहाण केली.तसेच आरोपी यांनी फिर्यादीच्या बोटात असलेली अंगठी बळजबरीने काढून घेतल्याची तक्रार देण्यात आली आहे.याप्रकरणी भिगवण पोलिसांनी अॅट्रासिटी तसेच आर्म एकट नुसार गुन्हा नोंद केला आहे.सदर दोन्ही गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर तपास करीत आहे .

सदर प्रकरणी एकमेव नाना अर्जुन बंडगर यांना अटक झाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून अटक केलेल्या बंडगर यांना न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here