मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीचा 20 लक्ष रुपयाचा निधी ; भिगवण वैकुंठ भूमीत होणार निवाऱ्याची सोय

0
745

भिगवण वार्ताहर.दि.११

भिगवण येथील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शेडचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे शुभहस्ते सरपंच गुराप्पा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले .कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे यांनी सांगितले.

भिगवण वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी शेडची व्यवस्था होती मात्र सुशोभीकरण करताना आणि स्मशानभूमीची उंची वाढविण्याच्या हेतूने तत्कालीन सरपंच तानाजी वायसे यांच्या कार्यकाळात हे शेड काढण्यात आले होते.मात्र शेड काढल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांनी याबाबत मंत्री दतात्रय भरणे यांच्याकडे मागणी केली होती.याच मागणीची तातडीने दखल घेत मंत्री भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीतून २० लाख रुपयाचा निधी मंजूर केला.या शेडचे भूमिपूजन आज करण्यात आले.

राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच गुराप्पा पवार, राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे,उपसरपंच सत्यवान भोसले ,बाजार समिती उपसभापती पराग जाधव ,पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे ,माजी सरपंच तानाजी वायसे ,दत्ता धवडे ,माजी उपसरपंच प्रदीप वाकसे ,अजिंक्य माडगे ,अशोक शिंदे ,जावेद शेख ,तुषार क्षीरसागर ,सचिन बोगावत ,बापूराव थोरात ,संदीप वाकसे ,मोहन शेंडगे ,वैभव देवकाते ,रोहित भरणे ,अमोल देवकाते , शुभम शेलार ,आप्पासाहेब गायकवाड ,रोहित शेलार ,विक्रम देवकाते ,निखील बोगावत ,अमोल वाघ ,आकाश उंडाळे ,दत्तात्रय पाचांगने ,अनिल तांबे  ,सुरेश बिबे ,दिनानाथ मारणे,भाऊसाहेब भरणे ,संदीप शेलार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here