भिगवण वार्ताहर.दि.२७
तक्रारवाडी गावच्या ग्रामसेविका यांची बदली करून याठिकाणी नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ , गटविकास अधिकारी इंदापूर तहशिलदार इंदापूर तसेच जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे यांच्याकडे लेखी निवेदन देणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली.
याबाबत बोलताना नागरिकांनी तक्रारवाडी ग्रामपंचायत सेविका अर्थात ग्रामविकास अधिकारी या त्यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहत नसून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगितले.तसेच ग्रामसेविका सर्वसामान्य नागरिकांना माहिती तसेच शासकीय योजनाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले जात आहे.तसेच त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यालयीन कामकाजाची वेळ आणि त्यांची उपस्थिती याबाबत नोटीस बोर्ड लावण्याची आवश्यकता असताना याची माहिती लावण्यात आली नाही.त्यामुळे नागरिकांना कामकाज करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे,.तसेच बऱ्याच वेळा वरिष्ठ कार्यालयाच्या मिटींगचे कारण सांगितले जात असून याबाबत कोणतीही पूर्वसूचना कार्यालयाच्या माध्यमातून दिली जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी तातडीने त्यांची बदली करून नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.