तक्रारवाडी गावातील अतिक्रमनाचा मुद्दा पेटला ; अतिक्रमण हटविण्याच्या मागणी साठी पीपल रिपब्लिकन पार्टीचा रास्ता रोकोचा इशारा

0
762

भिगवण वार्ताहर. दि. 19

तक्रारवाडी गावातील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असून रस्त्याच्या कडेला असणारे अतिक्रमण 7 दिवसाच्या आत हटविण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम खात्याने अतिक्रमण करणारया नागरिकांना दिली आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता चवरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत नोटीस वितरित केल्या आहेत. तर पीपल रिपब्लिकन पार्टीचे सचिन आढाव तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. बाळासाहेब भोसले यांनी 22 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील अतिक्रमण हटाविण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

तक्रारवाडी गाव हे अतिक्रमनाच्या विळख्याने ग्रासले असून वनविभाग असेल सार्वजनिक बांधकाम असेल अथवा ग्रामपंचायत विभाग असेल सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. याला गावातील राजकीय पुढारी आणि गुंड प्रवृत्ती च्या नागरिकांचा छुपा पाठिंबा असून दिवसा अतिक्रमण हटविण्याच्या गप्पा मारणारे पुढारी रात्री च्या वेळेत टपरी कुठं टाकावी याबाबत मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत.
सध्या मासे मार्केट येथे सुरु झालेल्या अतिक्रमनामुळे विषय वाढलेला दिसून येत आहे. मात्र याठिकाणी अतिक्रमण करणारी बहुतेक लोक हातावर पोट भरणारी आहेत. मात्र आता पर्यंत झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते पुढे आले नाही आणि ग्रामपंचायत विभाग ही पुढे आला नाही. अतिक्रमण करणार्यांना नोटीस दिल म्हणजे आपली जबाबदारी संपली म्हणणारे तत्कालीन सरपंच असो अथवा प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक असो. यामुळेच गेल्या 5 वर्षांपासून अतिक्रमण वाढत असून याला गुप्त राजकीय पाठबळ मिळत आहे. तर पाठीमागे असणारा प्लाट आमच्या मालकीचा आहे. मग रस्त्याच्या शेजारी असणारी जागा आमचीच असा अधिकार वाणीने सांगितले जात आहे.जागा सरकारची आणि दुकाने अतिक्रमण करणाची अशी परिस्थिती पाहाव्यास मिळत आहे. तर अनेक जण अतिक्रमण करून या जा्गांचे भाडे वसुल करत आहेत. यातून काहींना महिना 50000 पासुन लाखाच्या आत भाडे मिळत आहे. यांचा फायदा ना ग्रामपंचायत प्रशासनाला ना व्यावसाय करून पोट भरणार्यांना मिळत आहे.तर काही गोरगरीब प्लाट मालकाच्या जागेत रात्रीत बळजबरीने अतिक्रमण करून दादागिरी होत असल्याचे प्रकार ही घडत आहेत. अतिक्रमण करून केलेल्या व्यवसायात कधीच भरभराटी होत नाही याची माहिती असताना आणि गावात यांच्या नादाला कोणी लागावं अशी ओळख असणाऱ्या अतिक्रमण करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
अतिक्रमण करणाऱ्यांनी आता रस्ता सुद्धा ग्रासला जात असून गावातील बाहेर निघण्याच्या प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमनाचा वेढा पडत असल्याचे दिसून येत आहे.

अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी गावातील रस्ते मोकळ्या जागा आणि शासकीय जागा सोडल्या नाहीत त्यामुळे मागासवर्गीय नागरिकांना वापरण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी
पीपल रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते सचिन आढाव तसेच डॉ. बाळासाहेब भोसले यांनी 22 तारखेला रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. आता तरी प्रशासन जागे होईल आणि गावातील सर्व अतिक्रमण काढून रस्त्याना मोकळा श्वास घेऊ देतील काय हे येणारा काळ ठरविणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here