भिगवण वार्ताहर.दि.१४
शाळकरी मुलांना शाळेतून घरी सोडत असताना दीड वर्षाच्या चिमुरड्याला स्कूलबस खाली चिरडल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथे घडली.भोगी सणाच्या दिवशीच चिमुरड्याला आपले प्राण गमवावे लागल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार या अपघातात स्वराज महेश काशीद वय १ वर्ष १० महिने याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.याबाबत स्कूलबस चालक रोहित हनुमंत पवार रा.पोंधवडी याच्याविरोधात सर्व रस्त्याची माहिती असताना गाडी भरधाव वेगात चालवून अपघात झाल्यास एखाद्याचा जीव जावू शकतो याची जाणीव असताना हलगर्जीपणा करून अपघात केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या अपघाताबद्दल मिळालेल्या माहिती नुसार या लहानग्याची बहिण याच स्कूलबस ने प्रवास करीत घरी आली असता चिमुरडा गाडीच्या दुसऱ्या बाजूने आल्याची माहिती मिळत आहे.यावेळी चालकाचे लक्ष नसल्यामुळे चिमुरडा गाडी खाली येत चेंगरला गेला .याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गणेश बबन काशीद यांनी तक्रार दिली आहे.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे अंमलदार लोढी यांनी अपघात दाखल करून पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.