बंद घराचे दार तोडून 2 लाखाची चोरी 8 ; भिगवण परिसरातील अपार्टमेंट चोरांच्या निशाणावर

0
100

भिगवण वार्ताहर.दि.११

भिगवण परिसरात चोरट्यांनी डोके वर काढण्यास सुरवात केली असून दोन दिवसापूर्वी बारामती राशीन रोड शेजारील अरुण लोखंडे यांच्या घरी रात्रीच्या वेळी घरफोडी करीत २ लाखांच्या आसपास सोने चांदी आणि इतर ऐवज चोरून पोबारा केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिगवण हद्दीतील अरुण लोखंडे यांच्या इमारतीत राहणाऱ्या शाम जाधव यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे.जाधव हे दिवाळीच्या सणासाठी बाहेर गावी गेले असता चोरट्यांनी ८ तारखेला रात्री हि चोरी केली.यात चोरट्यांनी बंद घराचे कटावणी ने कोयंडे तोडून घरात प्रवेश करीत घरातील समसंग कंपनीचा टीव्ही ,सोन्याचे गंठन ,अंगठी ,कर्णफुले आणि चांदीच्या पैजण चोरून नेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी या दागिन्यांची बिले सोबत नेली आहेत.यावेळी जाधव यांनी सणासाठी आणलेला किराणा माल तसेच ड्रायफ्रुट सुधा चोरून नेला.यावेळी चोरट्यांनी घरात दिवाळीच्या फराळावर ताव मारला आणि अगदी निवांत चोरी करून पोबारा केला. जाधव गावावरून परत आल्यावर चोरीची माहिती मिळाली.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जात आहे .

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी नागरिकांना घाबरून न जाता  सावधानतेचा इशारा दिला असून घर बंद करून गावी जात असताना याची कल्पना शेजारील कुटुंबाना देण्याची माहिती दिली आहे.तसेच इमारती खाली सीसी टीव्ही बसविण्याच्या सूचना केली आहे.तसेच बंद घरात सोने चांदी तसेच रोख रक्कम ठेवू नये अशी सूचना दिल्या आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here