मदनवाडी येथील 21 वर्षीय नवतरुणाचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू.

0
2486

भिगवण वार्ताहर.दि.५

मदनवाडी येथील शरयू शरद चितारे वय २१ या तरुणाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

इंदापूर आणि दौंड तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हनुमंत चितारे परिवारातील शरद चितारे यांचा शरयू हा एकुलता एक मुलगा होता.अत्यंत देखणी शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर सदा स्मितहास्य असणाऱ्या या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालेल्या मृत्यूमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.शरयू हा त्याच्या मामाच्या गावी गेलेला असतानाच त्याला हा झटका आला.कोणताही वैदकीय उपचार मिळण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली .हृद्य विकाराने अतिशय कमी वयात दौंड तालुक्यातील खानावटे गावातील तरुणाचा मागील आठवड्यात तरुणाने आपला जीव गमावला तर आज मदनवाडी येथील शरयू चीतारे याला मृत्यूला सामोरे जावे लागले.शरयू च्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.तर अंत्यविधी दुपारी २ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here