पत्नीच्या मृत्यूमुळे आलेल्या नैराश्यातून गळफास घेत मदनवाडी गावाच्या तरुणाने संपविले जीवन. 7 महिन्याची चिमुकली आई वडिलांला झाली पोरकी

0
2350

भिगवण वार्ताहर .दि.२९

अल्पशा आजाराने पत्नीचा मृत्यू झाल्याच्या नैराश्यातून मदनवाडी येथील तरुणाने गळफास घेत जीवन संपवल्याची दुखद घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाळ उर्फ स्वप्नील प्रदीप सुतार वय.24 असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे .गोपाळ याचा भिगवण परिसरात मोबाईल विक्रीचा व्यवसाय असून दोन दिवसापूर्वीच गोपाळची पत्नी श्रावणी सुतार हिचे डेंगू आजारात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.पत्नीच्या अचानक झालेल्या मृत्युच्या नैराश्यातून गोपाळने हे टोकाचे पावूल उचलल्याची शक्यता आहे.रविवारी दुपारी घरी असताना नातेवाईक यांना मला कंटाळा आलाय मी थोडासा आराम करतो असे म्हणून गोपाळ खोलीत गेला होता.बराच वेळ होवूनही तो बाहेर येत नसल्यामुळे घरच्या सदस्यांनी आत जावून पाहिले असता खोलीच्या छताला नायलॉन दोरीच्या साहाह्याने लटकला असल्याचे दिसून आले.या घटनेची खबर गोपाळचा भाऊ संतोष सुतार यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली.

अत्यंत समजदार असा स्वभाव असणाऱ्या गोपाळ याने असे टोकाचे पावूल उचलल्या मुळे भिगवण आणि मदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तर ७ महिन्याची चिमुकली आई आणि वडिलांच्या मृत्यू मुळे पोरकी झाली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here