मदनवाडी गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलीस दलात सेवा बजावीत असणाऱ्या पोलीस जवानाचा रेल्वे अपघातात मृत्यू ; विक्रोळी कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान घडला अपघात

0
5500

भिगवण वार्ताहर.दि.११

मदनवाडी गावचे सुपुत्र आणि मुबई पोलीस दलात नोकरी करणाऱ्या पोलिसाचा विक्रोळी कांजुरमार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान अपघातात मृत्यू झाल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.होमगार्डची सेवा बजावीत असताना पोलीस  भरती होवून मुंबई येथे सेवा बजाविणाऱ्या तरुण पोलीस जवानाचा मृत्यू झाल्याने मदनवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती नुसार रवींद्र बाळासाहेब हाके वय २८ पोलीस कॉन्ष्टेबल बक्कल नंबर ३१९ नेमणूक एलए १ मुंबई शहर रा .मदनवाडी ता.इंदापूर यांचे रेल्वे अपघातात निधन झालेले आहे. सेवा बजावीत असतानाच पोलीस जवान रवींद्र यांचा हा मृत्यू झाला आहे.३ वर्षापूर्वी होमगार्ड ची सेवा बजावीत असताना रवींद्र हा पोलीस भरती झाला आणि मुंबई येथे तो सेवा बजावीत होता.तर रवींद्रचा छोटा भाऊ तुषार हा हि वर्षभरापूर्वी पोलीस भरती झाला असून तो जालना येथे ट्रेनिंग पूर्ण करीत आहे.साधारणपणे वर्षभरापूर्वीच रवींद्रचे लग्न होवून आठवड्यापूवी त्याला मुलगा झाला होता.त्याचा आनंद व्यक्त करून बुधवारी परत पोलीस सेवेत हजर झाला होता.अतिशय प्रामाणिक आणि पोलीस सेवेला वाहून घेणाऱ्या रवींद्रचा अपघाती मृत्यू झाल्याने मदनवाडी गावावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here