भिगवन वार्ताहर .दि. २६
पुणे सोलापूर महामार्गावर बिलट पेपर कंपनी समोरील बाजूला अकोले पाठीजवळ दुचाकीचा अपघात होऊन यात दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ४ वा. सुमारास घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात अजय सौदागर आणि शिवानंद डुंगरे यांचा मृत्यू झाला. दोन्ही मयत तरुण लातूर येथील रहिवासी असण्याची माहिती मिळत आहे हे तरुण आपल्या ताब्यातील स्कुटी वरून पुणे येथून लातूरकडे जात असताना हा अपघात घडला.यात अज्ञात वाहनाने ठोकर दिले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अपघात घडल्याची माहिती मिळताच आपुलकीची जागा ॲम्बुलन्स संचालक केतन वाघ यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी तरुणांना भिगवण येथील भिगवन मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार साठी दाखल केले मात्र उपचारा अगोदरच दोन्ही तरुण मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस अधिकारी महेश कुरेवाड यांनी अपघात स्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली तसेच मृत तरुणांची ओळख त्यांच्याजवळ असणाऱ्या कागदपत्र आणि मोबाईलच्या सहाय्याने पटवून याची माहिती पोलीस ठाण्यात दिली.
Home Uncategorized पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू. बिल्ट पेपर कंपनी...