भिगवण बारामती रोडवर झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू !मदनवाडी पिंपळे घाटात अज्ञात वाहणाने ठोकल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता .

0
2192

भिगवण वार्ताहर.दि.१२

भिगवण बारामती मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात भिगवण येथील विशाल उर्फ भैया कैलास धवडे वय ४१ यांचा जागीच मृत्यू झाला.बारामती येथील खासगी कंपनीतून काम करून त्यांच्या ताब्यातील एम.एच.42 ए बी 9427 या दुचाकीवरून घरी येत असताना हा अपघात घडला.बारामती भिगवण रोडवरील पिंपळे घाटाच्या उतारापासून १०० मीटर अंतरावर बारामती दिशेला हा अपघात घडला.सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सदर घटनेची खबर अमर धवडे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.

बारामती भिगवण रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून अनेक दुचाकी स्वारांचे अपघात घडले आहेत.तर भिगवण येथील दोन तरुण यात दगावले आहेत.तर काहीना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते वेग मर्यादेचे सूचना फलक आणि पोलीस प्रशासनाने अपघात घडू नये यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.आज झालेल्या अपघातात मृत पावलेल्या धवडे यांचे शवविच्छेदन भिगवण येथील ग्रामीण रुग्णालयात केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here