शासनाच्या योजनेतील गोल्डन कार्ड आणी आभा कार्ड साठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळणार मदत ; राजकीय जोडे बाजूला ठेवत गावातील नागरिकांसाठी विकास कामांना प्राधान्य देण्याचा सरपंच संतोष सोनवणे यांचा संकल्प
भिगवण वार्ताहर.दि.२३
सिद्धेश्वर निंबोडी ता.बारामती येथे १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा २२१ नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती नवनियुक्त सरपंच संतोष सोनवणे यांनी दिली.यावेळी रुग्णांची रक्तदाब ,मधुमेह तसेच डोळ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून भरघोस मताने निवडून आलेल्या सरपंच संतोष सोनवणे यांनी राजकीय मतभेद सोडून गावासाठी विकास कामांना महत्व देत वाटचाल सुरु केली आहे.याच अनुशंघाने १४ व्या वित्त आयोगातून गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्सेतून मुक्त करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.यासाठीं तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे ,बारामती पंचायत समिती आरोग्य अधिकारी डॉ.अनिलकुमार वाघमारे ,शिर्सुफळ प्राथमिक आरोग्य अधिकारी यांनी सहभाग नोंदवत रुग्णांची तपासणी केली.यावेळी भारत सरकारच्या योजनेतील गोल्डन कार्ड तसेच आभा कार्ड याविषयी मार्गदर्शन करून कार्ड काढण्याच्या विषयी मदत करण्यात आली.या आरोग्य शिबिरात जवळपास २२१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यावेळी बोलताना सरपंच संतोष सोनवणे यांनी शासनाच्या अनेक योजना नागरिकांसाठी तयर करण्यात आलेल्या असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य ती मदत ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्याचा मानस व्यक्त केला.
आरोग्य शिबिरासाठी विजय मदने आरोग्य सहाय्यक ,रुपाली बंडगर ,माधुरी शिंदे समुदाय अधिकारी ,एस.एम उदावंत आरोग्य सेविका ,विकास कापसे ,रुपाली धुमाळ ,कमळ शेळके असा शासकीय आरोग्य विभागाचा स्टाफ मदतीस उपस्थित होता. यावेळी उपसरपंच मुमताज मुलाणी तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविस्तार अधिकारी शिवाजी काळे यांनी आरोग्य शिबिराचे नियोजन केले.