भिगवण वार्ताहर.दि.26
संविधान दिना निम्मित सत्यवार्ता लेख !!
पत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी कि व्यावसायिकता ? असा सवाल गेली अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उठत आहेत.मात्र याचे उत्तर ना सरकारी यंत्रणेकडे आहे ना कायदे बनविणाऱ्या संसदेकडे त्यामुळे सामाजिक पत्रकारिता हा विषय नुसता नावापुरताच शिल्लक राहिलाय अशी आजची अवस्था आहे .
पाठीमागील काही वर्षात पत्रकारीतेमध्ये अमुलाग्र बदल होताना दिसून येत आहे.पूर्वीच्या काळात प्रिंट मिडीयाला अनंत साधारण महत्व होते.बातमी छापून आली म्हणजे तो प्रकार खराच आहे अस जनसामान्य नागरिकाचे मत होते.तर त्याला कायदेशीर महत्व हि होत.मात्र आता सोशल मिडीयाचा यात शिरकाव झाला असल्यामुळे कोणीही आपले पोर्टल युट्युब आणि न्यूज पोर्टल रजिस्टर करून पत्रकार होताना दिसून येत आहे.मात्र यामुळे पत्रकारिता हा सामाजिक धर्म नसून त्याला व्यावसायिकतेचा मुलामा दिला जात आहे. मागील काळातील पत्रकारिता आणि सध्याच्या पत्रकारितेत मोठी तफावत आहे. कोणतीही साधनसामग्री नसताना त्या वेळी पत्रकारिता करणे अवघड काम होते, तरीही सामाजिक बांधिलकी जोपासली गेली. आता पत्रकारांनी उपलब्ध साधनसामग्रीचा वापर केला पाहिजे. अन्यथा स्पर्धेत टिकाव धरू शकणार नाहीत. विविध स्तरावरील पत्रकारांना स्वत:च्या ताकदीचा भ्रम निर्माण होतो. त्यामुळे समाजात पत्रकाराविषयी तिरस्कार व्यक्त होताना दिसत आहे. राजकारणी पुढार्यांच्या टाकलेल्या काही आमिषास बळी न पडता पत्रकारांनी जबाबदारी व कर्तव्याने समाजात वागण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हे सर्व होत असताना कायदे बनविणाऱ्या संसदेकडे आणि न्याय व्यवस्थेने सध्या सुरु असलेल्या व्यावसायिक पत्रकारितेवर अंकुश ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
आजच्या पत्रकारितेचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना भीतीचा बागुलबुवा दाखवून व्यवसाय म्हणून होणे सर्वसामान्य जनतेच्या सामाजिक जीवनावर दूरगामी परिणाम करणारे असून यातून कायदेमंडळ आणि प्रशासन यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
…या आणि अशा अनेक सामाजिक विषयावरील बातम्या बद्दल आपले मत नक्की नोंदवावे …..सत्यवार्ता पोर्टल