भिगवण वार्ताहर.दि.६
तक्रारवाडी गावात सत्ताबदलामुळे विकास कामाला चालना मिळाली असून गावातील अंतर्गत रस्त्याची जवळपास १ कोटी ७५ लाख रुपयाचा कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली आहे.तर कामातील दर्जा चांगला राहावा यासाठी सरपंच मनीषा वाघ कामाच्या ठिकाणी भेट देवून कंत्राटदार यांना योग्य त्या सूचना देत आहेत.
तक्रारवाडी गावात मागील २ वर्षापासून राष्ट्रवादी विचाराच्या पदाधिकारी यांची सत्ता होती.मात्र सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे आणि इतर सदस्यांना सरपंच पदाचा मान मिळावा यासाठी तत्कालीन सरपंच सतीश वाघ यांनी राजीनामा दिला होता.तर यावेळी अनेक राजकीय डावपेच खेळून भाजपा विचाराच्या पदाधिकारी यांनी युक्त्या वापरत राष्ट्वादीची सत्ता अलगद उचलून टाकून सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या.सत्ताबदलामुळे गावातील अनेक विकास कामांना चालना मिळाली असून स्थगिती असलेलीं कामे आपली राजकीय चलाखी वापरून ती सुरु करण्यात आली आहेत.गावातील अंतर्गत रस्त्याचे नुसते भूमिपूजन नाही तर प्रत्यक्षात लाखो रुपयांच्या कामांना प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली आहे.सरपंच मनीषा वाघ ,उपसरपंच आशाताई जगताप आणि सदस्या संगीता वाघ ,प्राजक्ता वाघ ,शरद वाघ या सर्व विकास कामाच्या दर्जावर लक्ष देत असून कामे वर्षानुवर्ष टिकावू व्हावीत यासाठी प्रयत्न केला जात आहे.
कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ ,माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,विजयराव जगताप ,सचिन वाघ यांनी गावातील विकासकामासाठी अधिकचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.तसेच माळरान येथील शेतीसाठी असणाऱ्या वनविभागातील रस्त्यासाठी वरिष्ठ पातळीवर परवानगी आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.तक्रारवाडी गाव हे रोल मॉडेल गाव होण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सरपंच मनीषा वाघ यांनी सांगितले.