भिगवण वार्ताहर.दि.१५
भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांचा ग्रीन वल्र्ड प्राईड ऑफ इंडिया २०२३ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.या पुरस्काराने भिगवण पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक म्हणून भिगवण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप पवार यांनी कायदा सुव्यवस्था ,गुन्हेगारीचे उच्चाटन ,वाहतूक कोंडी सारख्या समस्या कायमस्वरूपी सुटाव्यात यासाठी कामकाज केले .विशेष करून भिगवण शहर हे शिक्षणासाठी हब समजले जाते.याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोड रोमिओ चा त्रास शाळकरी मुलीना सहन करावा लागत होता. याविषयी मोठ्या प्रमाणात कारवाया करून मुली आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले.तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निराकारण तातडीने करून त्यांना न्याय वाटेल अशी कार्यपद्धती अवलंबली.याच त्याच्या कार्याचा आढावा घेत मुक्तांगण इंग्लिश स्कूल आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅनड टेक्नोलोजी पुणे येथे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार वितरण प्रसंगी विविध शाळा महाविद्यालयांना ग्रीन वर्ल्ड क्लबच्या वतीने १० हजार पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी ,कॉसमोस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे ,पप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय कणेकर ,रामबंधू मसालाचे अध्यक्ष हेमंत राठी ,रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर ,ग्रीन वर्ल्ड चे अध्यक्ष गौतम कोतवा हे उपस्थित होते.पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.