म्हसोबावाडीतील विहिरीत गाडल्या गेलेल्या 4 मजुरांचे मृतदेह शोधण्यात एन डी आर एफ पथकाला यश ; 70 तासाच्या अविरत प्रयत्नातून मृतदेह मिळाले

0
811

भिगवण वार्ताहर.दि.४

सत्यवार्ता न्यूज नेटवर्क भिगवण

म्हसोबावाडी ता.इंदापूर येथील विहिरीची रिंग तयार करत असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली गाडले गेलेल्या ४ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात एन डी आर एफ पथकाला ७० तासांनंतर यश मिळाले. ७० तास उलटून गेल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत मजूर मिळण्याची आशा मावळली होती आणि प्रत्यक्षात तेच वास्तव समोर आले. मृतदेह बाहेर काढताच मृतांच्या नातेवाइकांनी न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नसल्याचे प्रशासनाला सांगितले.

म्हसोबावाडी येथे खडी क्रेशर साठी दगड काढून त्याठिकाणी झालेल्या अक्राळविक्राळ खड्याला विहिरीचे रूप देवून रिंग टाकण्याचे काम सुरु होते.तर हे काम करताना कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे रिंग बांधताना अपघात होऊन ४ मजूर मातीच्या खाली गाडले गेले होते.त्यांना जिवंत काढण्यासाठी एन.डी आर एफ पथक गेल्या दोन दिवसापासून अविरत पणे काम करीत होते.मात्र अनेक प्रयत्न करूनही मजूर ज्या ठिकाणी गाडले गेले होते त्या ठिकाणी पोहोचता येत नव्हते अखेर पूर्व बाजूला सुरु केलेले खोदकाम थांबवून दुसऱ्या बाजूला रप्म तयार करून मशीन खाली उतरवण्यात आल्या.आणि तब्बत ७० तास उलटून गेल्यावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका कामगाराचा मृतदेह मिळून आला.त्यानंतर शोधकार्य सुरु ठेवून ३ मजुरांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.मृतदेह बाहेर काढताच नातेवाईक यांनी हंबरडा फोडून रडण्यास सुरवात केली.त्यामुळे तेथील वातावरण अगदी रडण्या ओरडण्याच्या आवाजाने भारून गेलेले दिसून आले.

मृतदेह अम्बुलंस मध्ये ठेवताच मृतकाचे नातेवाइकांनी वाहन अडवून जोपर्यंत यातील दोषींना अटक करून न्याय मिळत नाही तो पर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याचे सांगितले.तर विहीर मालकावर तसेच रिंगच्या कंत्राटदार याच्यावर गुन्हा नोंद करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तर हा अपघात होता कि घातपात याची चौकशी करण्याची मागणी समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here