अभ्यास करताना मोबाईल पाहिल्या मुळे आईने गालावर चापट मारली म्हणून गळा आवळल्याची कबुली
जन्मदात्रीचा जीव घेऊन आत्महत्येचा बनाव पडला उघड .आई आणी मुलाच्या नात्याला कलंक……
भिगवण वार्ताहर.दि.१७
भिगवण गावच्या ग्रामपंचायत सदस्या तसलीम शेख यांचा मृत्यू आत्महत्या नसून खून असल्याचा प्रकार उघडकीस आला.तर हा खून करणारा आरोपी त्यांचाच मुलगा जीशान जमीर शेख वय १८ याला पोलिसांनी अटक केली आहे.
भिगवण गावच्या सदस्या तस्लीम जमीर शेख यांचा बुधवारी मृत्यू झाला होता.मृत्यू हा आत्महत्या केल्यामुळे झाल्याचे नातेवाईकांनी दवाखान्यात आणि लोणी काळभोर पोलिसांना माहिती देताना सांगण्यात आले होते.शवविच्छेदन करीत असताना डॉक्टरांना याबाबत संशय निर्माण झाल्यामुळे ३ डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले.त्यात महिलेचे गळा दाबून व डोक्याला जखम झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी डॉक्टरच्या अहवालानुसार चौकशी केली असता कोणीही नेमकी माहिती देताना आढळून आले नाही.त्यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करीत तपास करण्यास सुरवात केली होती.घटना घडल्यावेळी मयत तस्लीम यांचे पती जमीर आणि मुलगा जीशान हे दोघे घटनास्थळी होते.त्यामुळे पोलिसांनी त्यांची स्वतंत्र चौकशी केल्यावर जीशान याने गुन्ह्याची कबुली दिली.
जीशान याने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार वडील जमीर नमाज पठणासाठी तसेच धाकटी बहिण बाहेर गेली असताना तो अभ्यास करीत बसला होता.यावेळी अभ्यास करीत असताना जीशान मोबाईल पाहत असल्याच्या कारणावरून त्याची आई तस्लीम जीशानवर रागावली आणि त्याच्या गालावर चापत मारली.आईने मारल्याचा राग आल्याने जीशान याने तिला जोरात भिंतीवर ढकलून दिले.तर रागाच्या तावात तिचा गळा दाबला.यात तस्लीम यांचा मृत्यू झाला.आई निपचित पडल्याचे पाहून त्याने घाबरून आईचे मनगट मनगट कापले.परंतु मृत्यू झाल्याने त्यातून रक्त आले नाही.वडील येवून काही विचारातील म्हणून जीशान ने पंख्याला वायर अडकवून ठेवत आईने फाशी घेत आत्महत्या केली आणि मी तिला खाली उतरून ठेवल्याचे सांगत दवाखान्यात नेल्याने सदर प्रकार उघडकीस आला.याबाबत घरातील कोणीही तक्रार देण्यास तयार नसल्यामुळे पोलिसांच्या वतीने फिर्याद देण्यास आली.सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक काळे करत आहेत.