भिगवण वार्ताहर.दि.९
लोकशाही समाजात सरकारच्या पोलीस यंत्रणेइतकी दुसरी कोणतीही संस्था नागरिकाच्या जवळ नसते .त्यामुळे पोलीस यंत्रणेतील अधिकारी यांनी महिला आणि मुलीच्या मनात विश्वासार्ह परिस्थिती निर्माण केली तर यातून अमुलाग्र बदल घडू शकतात याच उद्देशाने कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी चंद्रशेखर पवार “ बांधिलकी नारी सन्मानाची ” हा विशेषांक प्रसिद्ध करून त्याचे भिगवण येथे पत्रकार आणि सामाजिक सेवकाच्या उपस्थितीत वितरण केले.
शालेय मुली आणि महिलांच्यावर दिवसेदिवस छेडछाडीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.काही प्रकरणात सोशन करणारा नात्यातील अथवा अत्यंत जवळच्या ओळखीचा असतो.त्यामुळे त्याची वाच्यता केली जात नाही.यातून पिडीतेची मानसिकता खचून जाते.याच बाबींचा विचार करून भिगवण पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भिगवण शहरात या बांधिलकी नारी सन्मानाची योजनेला सुरवात केली.ज्याप्रमाणे आपण दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांना आपला आजार सांगितल्याशिवाय डॉक्टर आपणाला ओषध देत नाही.त्याच प्रमाणे मुली आणि महिला यांनी आपणाला होत असलेल्या त्रासाबाबत पोलिसांना सांगितले नाही तर आरोपी विरोधात कारवाई करणे शक्य होत नाही.त्यामुळे सपोनि यादव यांनी महिला आणि मुलीचे कार्यक्रम आयोजित करत त्यांना बोलते केले. आणी याच योजनेला नारी सन्मानाची संकल्पना जोडून विशेष अंकाची निर्मिती करण्यात आली.यातून पोलिसांनी आपला पोलीसी खाक्या दाखवीत अनेक रोड रोमिओ आणि चॉकलेट हिरो विरोधात कारवाई करण्यात येवून मुलीना स्वच्छंदी जीवन जगण्यास वातावरण तयार केले. भिगवण पोलीस ठाण्याच्या कामात आपला वेगळा ठसा उमटविणारे यादव सध्या कर्जत येथे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावीत आहेत. तर भिगवण या ठिकाणी राबविलेली योजना कर्जत ठिकाणी राबवून या विशेष अंकाची प्रसिद्धी केली. शुक्रवारी सकाळी पुस्तक वितरण वेळी पत्रकार भारत मल्लाव ,प्रशांत चवरे ,दादासाहेब थोरात ,संपत बंडगर ,वैभव देवकाते ,आप्पासाहेब बंडगर तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.