भिगवण वार्ताहर.दि.१५
भिगवण राशीन राज्यमार्गावर उस वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी झाला.मदनवाडी गावच्या हद्दीत तुळजाभवानी हॉटेल समोर हा अपघात घडला असून नागरिकांनी ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात मोहम्मद आबिद अन्सारी वय .२४ सध्या रा.रॉयल इन हॉटेल मदनवाडी मूळ.डाबाकेंद ता.नारायणपूर जि.जामताडा झारखंड याचा मृत्यू झाला आहे.अन्सारी त्याच्या ताब्यात असणाऱ्या दुचाकी एम.एच.४२ पी ७००० वरून जात असताना मदनवाडी चौकाशेजारी उस वाहतूक करणाऱ्या मोकळ्या वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे अपघात घडला.यात अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सोहेब अख्तर अन्सारी गंभीर जखमी झाला.जखमीला भिगवण येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याबाबत अमोल संजीव नंदे वय.२८ रा.मांजरगाव ता.करमाळा याच्या विरोधात हयगयीने अविचाराने राहिदारीचे नियम न पाळता वाहन चालवून दुचाकी स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर अपघात ग्रस्त ट्रॅकटरला नंबर नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
सध्या उस गाळपाचा सीझन सुरु झाला असून उस वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे अनेक अपघात घडत आहेत.यात जीवितहानीही होत असून परिवहन विभाग पोलीस प्रशासन आपआपली जबाबदारी पार पाडून अपघात कमी होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.मात्र कारखानदार मात्र विना लायसन ड्रायव्हर ,विना पासिंग वहाने आणि ओव्हरलोड वाहतूक याकडे लक्ष देत नाहीत.त्यामुळे अपघात घडून निष्पाप नागरिकांचे जीव अपघातात जात आहेत.त्यामुळे यापुढे अपघात झाल्यास आणि जीवितहानी झाल्यास सदर कारखान्याला यात दोषी मानून संबंधितांवर कारवाई झाल्यास यातील गंभीरता कारखाना प्रशासनाला जाणवेल अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.