भिगवण वार्ताहर.दि.१३
पोंधवडी ग्रामपंचायत माध्यमातून खोदण्यात येणाऱ्या विहिरीच्या ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या घराला तडे जात असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.तर गावाला लागुनच होत असलेल्या विहिरीवर कोणतीही सुरक्षित उपाय योजना केल्या जात नसल्याचे बोलले जात आहे.
पोंधवडी गावातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा जलजीवन मिशन अंतर्गत पोंधवडी गावात या विहिरीचे काम सुरु करण्यात आलेले आहे.हि विहीर गावाच्या अगदी काही फुटांवर खोदली जात असून कंत्राटदार यांच्याकडून कोणतीही सुरक्षितता पाळली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तर या विहिरीत स्पोटके उडवली जात असून याच्या हादर्याने घरांना तडे जावू लागले आहेत.याबाबत गावातील नागरिक संजय पवार यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली आहे.गटविकास अधिकारी विजय परीट यांनी अभियंत्यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाला दिल्या आहेत.तर ब्लास्टिंग करताना कोणतीही काळजी घेतली जात नसल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे दिसून येते.
याबाबत गटविकास अधिकारी विजय परीट यांनी याविषयी ग्रामपंचायत विभागाला सूचना केल्या असून पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगितले.तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रथम विचार करून योग्य ते निकष पाळले बाबत सूचना केल्याचे सांगितले.