भिगवण ग्रामपंचायतच्या वतीने आदर्शवत मिरवणूक ;टाळ मृदुंगाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप

0
290

भिगवण वार्ताहर.दि.९

भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदुंगाच्या नादात भजने गावून गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. डीजे गुलाल आणि बीभत्स अंगविक्षेप नृत्याला फाटा देत अनेक गणेश मंडळासमोर हा आदर्श ठेवल्याचे या मिरवणुकीतून दिसून आले.

भिगवण ग्रामपंचायत दरवर्षी गणपती विराजमान करीत असतात.मागील दोन वर्ष मात्र हा आनंद उत्सव शासनाच्या निर्बंधांमुळे होवू शकला नाही.मात्र कोरोना आटोक्यात येताच शासनाच्या वतीने निर्बंधमुक्त उत्सवाला परवानगी मिळाल्यामुळे सत्तेत आलेल्या कार्यकारिणीने मोठ्या उत्साहात गणेश विराजमान केले. आजच्या विसर्जनाच्या दिवशी सर्व सदस्यांनी तसेच पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी वारकरी पोशाख घालत हाती टाळ मृदुंगाच्या समवेत मिरवणुकीत सहभाग घेतला.यावेळी सरपंच तानाजी वायसे ,बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव ,इंदापूर समितीचे माजी उपसभापती संजयभाऊ देहाडे यांनी सर्व सदस्यांना सोबत घेत गणपती बाप्पांना निरोप दिला. यावेळी सर्व सदस्यांनी हाती टाळ घेत ‘ज्ञानबा तुकाराम ’ ‘ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ’ अशी भजने गात मिरवणुकीत सहभाग नोंदवला.भिगवण ग्रामपंचायत यांनी प्लास्टिक मुक्त भिगवण तसेच हरितक्रांती करणारे भिगवण असे आदर्श ग्रामस्थांसमोर ठेवले असतानाच आज विसर्जन मिरवणुकीत भजने गात गणपती बाप्पाला दिलेला निरोप तरुण मंडळी समोर आदर्श ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here