भिगवण पोलिसांचा उत्साही वातावरणात गणपती बाप्पाला निरोप ;विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचा सहभाग

0
859

भिगवण वार्ताहर.दि.९

भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने विराजमान केलेल्या गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.यावेळी सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलिसांनी बेन्झोच्या ठेक्यावर थिरकत आनंदी वातावरणात बाप्पाला निरोप दिला.

भिगवण पोलीस ठाण्यात प्रत्येक वर्षी गणपती विराजमान केले जातात.मात्र मागील दोन वर्षात आलेल्या जागतिक महामारी मुळे हा उत्सव साजरा करण्यात आला नाही.मात्र सरकारने या वर्षी सर्व निर्बंध हटविल्यामुळे आणि पोलीस प्रशासनाचा मुख्य भाग असल्यामुळे भिगवण पोलिसांनी मोठ्या उत्साहात गणपती विराजमान केले होते.आज १० व्या दिवशी सर्व पोलीस अधिकारी यांनी कुडता पायजमा सारखा पारंपारिक वेशभूषा करीत आणि महिला पोलिसांनी फेटे बांधून विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.यावेळी बारामती विभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट देत मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला .प्रभारी पोलीस अधिकारी दिलीप पवार ,पीएसआय विनायक दडसपाटील,रुपेश कदम ,सुभाष रूपनवर ,अंतूल पठाण ,महेश उगले ,नाना वीर ,रामदास जाधव यांनी अतिशय शिस्तबद्ध नियोजन करीत गणपती बाप्पाला निरोप दिला.यावेळी बेन्झो च्या तालावर थिरकत पोलीस बांधवांनी आनद लुटला.

भिगवण पोलीस ठाण्यापासून सुरु झालेली विसर्जन मिरवणुक हायस्कूल रस्त्याने जाणता राजा चौक ,शिवाजी महाराज चौक ,कला महाविद्यालय ,तसेच दुर्गामाता मंदिराच्या समोरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पुढे तक्रारवाडी चौकातून राशीन रस्ता अशा मार्गाने काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here