भिगवण रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा .

0
1131

भिगवण वार्ताहर दि.३१

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आलेल्या सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेली सामाजिक असुरक्षितता अजूनही गेलेली सामाजिक विषम सामाजिक विषमते मधून निर्माण होणारी असुरक्षितता व त्यातून गमावलेली संवेदनशीलता यामुळे संचय करण्याची वृत्ती वाढत आहे आणि ती सामाजिक असुरक्षितते मुळे निर्माण झाली आहे.आज मी माझे घर माझेच अशी वृत्तीमुळे संयुक्त कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे असे विचार रोटरी चे वाईस गव्हर्नर मोहन पालेशा यांनी भिगवण रोटरी क्लब पदग्रहण समारंभ दरम्यान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे गव्हर्नर मोहन पालेशा, असिस्टंट गव्हर्नर निखिल मुथा , इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, हॅप्पी व्हिलेजचे डायरेक्टर वसंत माळुंजकर, रोटरी मेडिकल डायरेक्टर पल्लवी साबळे तसेच भिगवन रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, संस्थापक उपाध्यक्ष महेश शेंडगे ,रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष संजय खाडे, सेक्रेटरी सुषमा वाघ, भिगवण पोलीस स्टेशनचे दडस पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

मनुष्य स्वप्न मध्ये जास्त आणि वर्तमानात कमी जगत आहे. मनुष्याची संवेदना तरल आणि उत्कंट असणे आवश्यक आहे संवेदना समाज विकासाला आवश्यक असून आज देशांमध्ये संवेदनशील नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. सर्व भौतिक सुख वस्तू गोळा करण्याच्या नादात मनुष्य आनंदी होतच नाही. त्यासाठी सामाजिक भान ठेवून समाजात काम करताना प्रत्येकाने सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे यासाठी रोटरीचे कार्य महत्त्वपूर्ण आहे असे मत पालेशा यांनी व्यक्त केले.
संपूर्ण जिल्ह्यात भिगवण क्लबचे काम अत्यंत उत्तम पद्धतीने चाललेले आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भिगवन क्लब सध्या सर्वोत्कृष्ट असे काम करत आहे असे मत प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केले.
यावेळी मावळते अध्यक्ष संजय खाडे यांनी केलेल्या विविध कामांचा वर्षभरातील आढावा सादर केला..
यावेळी पुणे विभागापैकी ग्रामीण भागातून रोटरी युथ एक्सचेंज च्या माध्यमातून पहिल्यांदा भिगवन मधील सुजित भोंगळे हा पुढील शिक्षणासाठी रोटरीतर्फे अमेरिका येथे जात आहे त्यामुळे त्याचा विशेष सत्कार करण्यात आला .

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून पुढील वर्षभरात विविध सामाजिक ,शैक्षणिक व आरोग्य विषयक कामे सर्वांना बरोबर घेऊन करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली . या कार्यक्रमांमध्ये नवीन मेंबर तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर ला पिन लावण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये नवीन सदस्य विठ्ठल थोरात, आनंद वांझखडे, प्रियंका बोरा यांनी रोटरी जॉईन केली .
बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये अध्यक्ष डॉक्टर अमोल खानावरे,सेक्रेटरी वैशाली बोगावत,खजिनदार संतोष सवाने,उपाध्यक्ष किरण रायसोनी, क्लब ट्रेनर संजय खाडे, एडमिनिस्ट्रेशन धरनेद्र गांधी, फाउंडेशन संदीप बोगावत, मेंबरशिप प्रवीण वाघ, सर्विस प्रोजेक्ट संपत बंडगर व रियाज शेख, मेडिकल प्रोजेक्ट डॉक्टर ज्ञानेश रेणुकर ,पब्लिक इमेज औदुंबर हुलगे, आयटी ऑफिसर प्रदीप ताटे व नामदेव कुदळे, युथ सर्विस संजय चौधरी यांचा समावेश करण्यात आला .
पदग्रहण कार्यक्रमाचे नियोजन बाळासाहेब सोनवणे, अफजल भाई, कमलेश गांधी, संजय रायसोनी, तुषार क्षिरसागर ,डॉक्टर महेश गाढवे, डॉक्टर अमित खानावरे, थॉमस मथाई, अतुल वाघ, पप्पू भोंग, कुलदीप ननवरे, मीनाताई बंडगर, दीपा भोंगळे, रेखा खाडे ,तेहमिन शेख व डॉ. शिवरानी खानावरे यांनी केले…. पदग्रहण समारंभासाठी दौंड, बारामती, इंदापूर, पाटस, कुरकुंभ या ठिकाणातील रोटरी क्लबचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव बंडगर व रणजित भोंगळे यांनी केले तर आभार वैशाली बोगावत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here