भिगवण वार्ताहर .दि .२७
शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनांमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होते.असे मनोगत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले .भिगवण येथील आदर्श शाळेतील रौप्य महोत्सव कार्यक्रम वेळी भरणे बोलत होते .
डॉ खानावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने पंचवीस वर्षापुर्वी प्रतिकुल परिस्थितींमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करुन या भागातील विदयार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली ही अतिशय महत्वाची बाब आहे. पंचवीस वर्षापुर्वी लावलेल्या रोपटयाचा वटवृक्ष झाला आहे. सर्वसामान्यांच्या शिक्षणाचे केंद्र असलेल्या साईनाथ शिक्षण मंडळास सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डी एन जगताप .अॅड. महेश देवकाते, प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, अभिजीत तांबिले, प्रमिलाताई जाधव, हेमाताई माडगे, सचिन बोगावत,धनाजी थोरात, बाळासाहेब सोनवणे, संजय खाडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे व संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी ना. भरणे यांचे हस्ते विज्ञान प्रयोगशाळेचा उद्घाटन करण्यात आले. ना. भरणे पुढे म्हणाले, साईनाथ शिक्षण संस्थेमध्ये भौतिक सुविधांसाठी आवश्यक ती मदत केली जाईल. शैक्षणिक संकुलामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी २० लाख रुपये, व्यायामशाळेसाठी आवश्यक निधी व वाचनालयांसाठी ५० हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक संस्थापक डॉ. चंद्रकांत खानावरे यांनी केले ,सुत्रसंचालन निलेश चांदगुडे व डॉ. काशीनाथ सोलनकर यांनी तर आभार डॉ. अमोल खानावरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याधापिका सुचेता साळुंखे,पल्लवी वाघ, संचालक व शिक्षक यांचे विशेष परिश्रम घेतले.
चौकट ..बिल्ट ग्राफिक कंपनीने या शाळेसाठी ११ संगणक दिले याबद्दल कंपनीचे कौतुक करत असताना कंपनी सामाजिक सेवेत हात आखडता घेत असल्याची खंत व्यक्त करत अजूनही काही सामाजिक सेवेत कंपनीने योगदान द्यावे असे भरणे यांनी कंपनी अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांना सुचविले.