भिगवण वार्ताहर.दि.३
भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. भिगवणकर नागरिकांनी पवार यांना मिळालेल्या मानाच्या पुरस्काराबद्दल कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला .
भिगवण पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावर नियुक्ती होताच सपोनि दिलीप पवार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा कोणाताही धागेदोरे नसताना कसब पणाला लावीत तपास केला. निरगुडे येथील खून प्रकरण अकोले येथील पत्नीच्या प्रियकराने केलेल्या नवर्याचा खून तसेच शेटफळ येथील चुलत भावाने केलेला खून या सर्व प्रकरणात पवार यांनी गुप्त पद्धतीने आणि तांत्रिक विश्लेषनाचा आधार घेत तपास करीत आरोपीना गजाआड केले आहे.तर भिगवण मधील नामंकित पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या गुन्ह्रेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.तर भिगवण हे शहर पुणे सोलापूर महामार्गावर असल्याने या ठिकाणी होत असलेल्या चोरट्या गांजाची वाहने पकडीत कारवाया केलेल्या आहेत.
तसेच अनेक गुंतागुंत असलेल्या गुन्ह्यात सहकारी पोलिसांची मदत घेत गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे काम केले आहे .याच सर्व तपास कामी त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून बहिर्जी नाईक हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता .बुधवार दि २ फेब्रुवारी रोजी पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात अधीक्षक डॉ .अभिनव देशमुख यांच्या हस्ते दिलीप पवार यांना हा पुरस्कार देण्यात आला.
भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी ज्या प्रमाणे अत्यंत जिकिरीच्या गुन्ह्यात तपास करीत आरोपींना गजाआड केले त्यांना मिळालेला पुरस्कारा मुळे भिगवणकरांनी त्यांचे अभिनंदन करीत कौतुक केले.