निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!

0
399
निसर्गातील 'इंजिनिअर' साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची 'कारागिरी' मनावर भुरळ घालणारी!

खेड:विजय सोनवणे

‘अरे खोप्यामधी खोपा

 सुगरणीचा चांगला

 देखा पिलासाठी तिनं

 झोका झाडाले टांगला’

निसर्गकन्या,कवयित्री बहिणाबाई यांनी सुगरणीच्या कौशल्याचे वर्णन या कवितेतून केलेले आहे.

इवलीशी चोच आणि पायाची दोन बोटं…इंजिनियरलाही लाजवेल एवढं टॅलेंट मोठं… खरोखरच मनाला अचंबा वाटावा अशी गोष्ट आहे सुगरण पक्ष्यांच्या घरट्यांची. निसर्गातील अनेक चमत्कार आपण पाहतो त्यात सुगरणीचा खोपा देखील निसर्गातील उत्कृष्ट कारागिरीचा नमुनाच आहे.

निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!

खेड शिवारातील एका उसाच्या बांधावर असणाऱ्या नारळाच्या झाडाच्या फांदीला लटकलेली सुगरणीच्या खोप्याची घरटी मनाला सुखद धक्का देणारी आहे.गळा आणि पोटावर पिवळ्या रंगाची उधळण केलेला सुगरण पक्षी बहुतांशी देशी बाभळीच्या झाडावर दिसून आल्याशिवाय राहत नाही.त्यांच्याकडुन बांधण्यात येत असलेली अतिशय नाजूक विणकाम असलेली ही सुंदर घरटी प्रत्येकाच्या मनावर भुरळ घालणारी आहेत.

साधारणत: पावसाआधी जुन महिन्यात नर पक्षांकडून घरटी बांधण्याची लगबग सुरू होते.

निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!

जून ते ऑगस्ट हा त्यांचा विणीचा हंगाम असतो.गवताच्या काडीने झाडाच्या फांद्यावर घरट्याची पहिली गाठ बांधताना त्यांचे खरे टॅलेंट आपल्याला दिसून येते. गवत व शिंदीच्या काड्यापासून नर काही दिवसातच आपले घरटे तयार करतो आणि हे घर तयार झाल्यानंतर सुगरण या घराची न्याहाळणी करते.घर आवडले तरच ती तिथे थांबते.मात्र घरटे न आवडल्यास नर पक्षाकडून ते घरचे मोडले जाते व पुन्हा नवीन घरटे तयार केले जाते.

शत्रुपक्षी व सापांपासून संरक्षण व्हावे यासाठीच ही घरटी उंच फांद्यांवर आणि फांद्यांच्या टोकाला बांधण्यात येत असावीत.त्यांच्या विचारसरणीचा अभ्यास माणसाने करावा आणि आपले निसर्गातील धोक्यांपासुन संरक्षण करावे हा संदेश जणु हे सुगरण पक्षी देताना दिसतात.सुबक आणि आकर्षक घरटी जेंव्हा वाऱ्यावर झुलतात तेंव्हा झोका झुलावा असाच भास आपल्याला होऊ लागतो.

खेडची नैसर्गिक संपन्नता पक्षांची संख्या वाढवणारी! खेड येथे चहुबाजूंनी हिरवाई असुन या परिसराला वरदायिनी म्हणून लाभलेली भीमा नदी यामुळे हा भाग कायम संपन्न वाटतो. अनेक देशी झाडे,विविध जातींचे पक्षी यामुळे या परिसरात पक्षांची किलबिल नेहमी कानी पडते. देशी झाडांवर सुगरणीची घरटी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात ही बाब खेडच्या सौंदर्यात भर घालणारी आहे.

छाया: खेड शिवारात उसाच्या शेताच्या बांधावर असलेल्या नारळाच्या झाडाच्या फांद्यांवर साकारलेली ही मनमोहक घरटी (छाया:विजय सोनवणे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here