उजनीच्या पुलाखाली आढळला पोत्यात भरलेला मृतदेह ; मदनवाडी हद्दीतील खळबळ जनक प्रकार

0
14

अनोळखी ४० ते४५ वयाच्या पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रसिद्धी पत्रका द्वारे आवाहन

भिगवण वार्ताहर .दि.२५

भिगवण पोलीस ठाणे हद्दीत उजनी धरणाच्या पाण्यात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.भिगवण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मदनवाडी गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्ग सर्विस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पुलाखाली पोत्यात भरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला.यावेळी पोलिसांनी हे पोते बाहेर काढून पाहिले असता यात ४० ते ४५ वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.मयताच्या अंगावर निळ्या रंगाची जीन पँनट असल्याचे आढळून आले.याबाबत मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब वनवे यांनी तक्रार दिली आहे.भिगवण पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत पुणे येथील ससून रुग्णालयात शवविचेद्न करण्यासाठी पाठवून दिला आहे.भिगवण पोलीस या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत असून याबाबत प्रसिद्धी पत्रक काढून ओळख पटविण्याचे आवाहन करीत असल्याचे सपोनि दिलीप पवार यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here