भिगवण वार्ताहर .दि .१२
भिगवण रोटरी क्लब यांच्या माध्यमातून पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिगवण मराठी पत्रकार संघास संगणक भेट देण्यात आला . तारादेवी लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्तेयाचे वितरण करण्यात आले .
आजच्या काळात संगणक हा काळाची गरज मानला जातो . ग्रामीण भागातील बातम्यांचे संकलन करून त्याचे प्रसिद्धी करण्यासाठी संगणकाची आवश्यकता भासते .याच्याच विचार करून पत्रकार दिनाच्या निमित्ताने मराठी संघाला भेट देण्यात आल्याचे अध्यक्ष संजय खाडे यांनी सांगितले . रोटरीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली जातात त्यांच्या या सेवेच्या कार्याची बातमी करण्यात मराठी पत्रकार संघाचे योगदान असते त्याची उतराई या स्वरूपात झाली असल्याचे मत नियोजित अध्यक्ष डॉ .अमोल खानावरे यांनी व्यक्त केले .
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ प्रशांत चवरे , संघातील सर्व पत्रकार , भिगवण पोलिस स्टेशनचे ए पी आय दिलीप पवार , तुषार झेंडेपाटील जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे, पराग जाधव, डी एन जगताप,शंकरराव गायकवाड ,डॉ.अमोल खानावरे ,संपत बंडगर, रियाज शेख, नामदेव कुदळे, संजय चौधरी, कमलेश गांधी, धरनेंद्र गांधी, प्रदीप ताटे, औदुंबर हुलगे संजय रायसोनी, तुषार क्षिरसागर, रंजीत भोंगळे , डॉ .अमित खानावरे उपस्थित होते .