डाळज वार्ता .१७
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानात इंदापुर तालुक्याने आघाडी घेतली असुन डाळज नं १ येथे सर्वेक्षण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी सर्वेक्षणात सहभाग घेत स्वतः नागरिकांची तपासणी केली आणि लक्षण असणाऱ्या नागरिकांनी रॅपीड ॲंटिजन टेस्टसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
आज डाळज गावात २४५ कुटुंबातील नागरिकांचे सर्वेक्षण पल्स ऑक्सिमिटर, टेम्प्रेचर गणच्या सहाय्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डाळज व प्राथमिक शिक्षक यांच्या ६ पथकाने केली यामध्ये गावातील नागरिकांनी सहकार्य केले गावात आजपर्यंत ३१ पेशन्ट कोरोना पोजिटीव्ही होते त्यातील ६ जण उपचार घेत आहेत व बाकीचे रुग्ण बरे झाले आहेत तर एकाची मयत झाली आहे.

सर्वेक्षण मध्ये ४७ जण संशयित आढळ्याने त्यांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्यात आली यामध्ये २ जण पोजिटीव्ह आले.
अभियानात जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पोलीस उपनिरीक्षक रियाझ शेख ,विस्तार अधिकारी दिलीप जगताप, सरपंच विकास कुंभार उपसरपंच हनुमंत मेटे, कुमार परकाळे, तलाठी गायकवाड, ग्रामसेवक जहांगीर मुलाणी, आरोग्य विभागाचे डॉक्टर व्यवहारे, समुदाय आरोग्य अधिकारी , मृदुला जगताप भगत, किर्ती व्यवहारे, टेस्टिंग लॅबचे पाळंदे, अशोक मोरे उपस्थित होत.