भिगवण वार्ताहर.दि.१०
कोरोना काळात फटाक्याची आतिषबाजी करणे पडले महागात, कोरोना सारख्या महामारीमुळे सर्वसामान्य जनता त्रासून गेली असताना स्वताचा वाढदिवस फटाक्यांची आतिषबाजी करीत साजरा करणाऱ्या महाभागाला भिगवण पोलिसांनी चाप लावण्याचे काम केले.
वाढदिवस असणाऱ्या बर्थडे बॉय आणि हॉटेल चालकाच्या विरोधात भा.द.वि कलम १८८ प्रमाणे गुन्हा नोंद करीत याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती नुसार नितीन दिलीप कदम तसेच हॉटेल मालक भूषण रामराजे शिंदे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोरोना सारख्या महामारी चा काळ सुरु असताना आपल्या वाढदिवसाचे आयोजन करीत मोठ्या प्रमाणावर तरुणांची गर्दी जमवीत सोशल डीस्टन्सिंग चे नियम धाब्यावर बसवीत फटाक्यांची आतिषबाजी करीत वाढदिवस साजरा केला जात होता.
तर हॉटेल मालकाने या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी न घेता जागा उपलब्ध करून दिली होती.त्यामुळे भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सदर प्रकरणी सहा.फौजदार जगदीश पोमणे यांच्या तक्रारी वरून गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वच स्तरातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.याबाबत बोलताना प्रभारी पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना सामाजिक स्थितीचे भान ठेवण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना सारखी महाभयानक परिस्थिती असताना आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा जीवाचे रान करून समाजाचे रक्षण करीत असताना वाढदिवसाला फटाक्यांची आतिषबाजी असो अथवा लग्नसमारंभ डीजे लावून जोमात करणे योग्य नसल्याचे सांगितले.तर अशा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.