भिगवण वार्ता .30
तक्रारवाडी येथील हॉटेल चालकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे .नातेसंबंधात हा हल्ला करण्यात आल्याने या संबंधी भिगवण पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यात आलेली नाही मात्र या भांडणाचे प्रतिसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारवाडी येथील हा प्रकार असून कारखाना ऑफिस शेजारी असणाऱ्या हॉटेल चालकांवर हा हल्ला करण्यात आला आहे .
गावातील आणि नाते संबंधातील ही भांडणे असल्याची चर्चा आहे .अगदी कांद्याचे पैसे देण्या घेण्याच्या किरकोळ कारणावरून हे वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे .तर एकूण तीन इसमानी एका इसमा वर हा हल्ला करण्यात आला .यात हॉटेल व्यावसायिकाला भरपूर मारहाण करण्यात आली असून शरीरावर अनेक जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे .
मासे विक्री साठी जागा धरण्यावरून आज पर्यंत अनेक भांडणे लागत असताना ग्रामपंचायत प्रशासन मूग गिळून गप्प राहत असल्याचे दिसून येत आहे .तर या भांडणात गावातील राजकीय व्यक्ती आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगत आहे .खोटा गुन्हा नोंद करण्याचे प्रयत्न ही या जागा प्रकरणात पुढे येत असून अजूनही अनेक वाद या प्रकरणात पुढे येत आहेत .तर राज्य मार्गात जाणाऱ्या या जागे पायी अनेक भांडणाचे मूळ असल्याची माहिती मिळत आहे .
या भांडणात नाते संबंध येत असल्यामुळे पोलीस ठाण्यात या विषयी कोणत्याच प्रकारची तक्रार दिली गेली नसल्याची माहिती समोर येत आहे .
मात्र अगदी शांत म्हणून ओळख असणाऱ्या तक्रार वाडी गावाची ओळख भांडकुदळ गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे .तर कांद्याचा वाढत असलेला भाव याकडेही भांडणाचा मूळ मुद्दा म्हणून पाहिले जात आहे .
अगदी सकाळच्या सुमारास झालेल्या या भांडणच्या ठिकाणी 100 च्या वर बघ्या ची गर्दी झाल्याची पाहायला मिळाली .