तक्रारवाडी सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश वाटप ; सभासदांची दिवाळी होणार गोड

0
436

भिगवण वार्ताहर. दि.३१

तक्रारवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने शेतकरी सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करीत सभासदांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.संस्थेच्या ३६५ सभासदांना १० टक्के प्रमाणे जवळपास २ लाख २७ हजार रुपयाचे वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन

विकासराव वाघ यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या संस्थेचा वसूल १०० टक्के पर्यंत होता.मात्र मागील काही वर्षात शासनाच्या कर्ज माफीतील विसंवादामुळे काही शेतकरी कर्ज भरण्यात दिरंगाई करीत आहेत.असे असूनही संस्था नफ्यात आलेली आहे.संस्थेला स्वताची जागा नसली तरी ग्रामपंचायत तक्रारवाडी यांच्या इमारतीत कामकाज केले जाते.तर लवकरच संस्थेची सुसज्ज इमारत बांधण्याचा संकल्प सोसायटी सदस्यांनी घेतला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली .दिवाळी पूर्वी नफा वाटप केल्यामुळे सभासदांना याचा फायदा होणार आहे .या नफा वाटपाच्या कार्यक्रमाला चेअरमन विकास वाघ,व्हा.चेअरमन अमोल वाघ ,रामभाऊ जाधव ,माजी उपसरपंच प्रशांत वाघ , जेष्ठ मार्गदर्शक शामराव वाघ ,मा. सरपंच पोपटराव वाघ ,राजेंद्र आढाव ,दिगांबर वाघ ,अर्जुन जराड ,सचिन वाघ ,अनिल वाघ ,बलभीम आढाव ,मधुकर पिसाळ ,युवराज काळगे ,सचिव सिकंदर आतार ,सेवक शरद वाघ ,नंदकुमार मोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here