इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने भिगवण येथे रस्ता रोको

0
315

भिगवण वार्ता .४

इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने भिगवण येथे शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळेस मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व मंडलाधिकारी मकरंद तांबडे यांना देण्यात आले.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अतिशय शांततेत अर्धातासाहून अधिक काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.

“एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे” या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत, राज्य सरकारवर रोष व्यक्त केला व राज्य सरकारने केंद्र सरकारवर दबाव टाकून आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी. नोकर भरतीला स्थगिती द्यावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासकीय नोकरीतील बाबू बाबतीत नाराजी व्यक्त केली .

तर शैक्षणिक मंत्र्याने तातडीने घेतलेले निर्णय बाबत तसेच गृहमंत्र्यांनी पोलीस भरती बाबत काढलेल्या भरती विषयी नाराजी व्यक्त केली. सदर मागण्यांचा सरकारने जर सकारात्मक विचार केला नाही तर, भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तयार ठेवला होता. रस्ता रोको आंदोलन समारोप झाल्यानंतर भिगवन पोलिसांनी २८ कार्यकर्त्यांना अटक करीत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here