भिगवन वार्ता. दिनांक ,४
कर्जत तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप विनामोबदला करण्यात आले.

सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या आजाराला थांबवण्यासाठी अनेक प्रकारची उपाययोजना केली जात आहे त्यातीलच एक उपाय म्हणून वाफ यचे मशीन अर्थात विपोराईझर याचा वापर सर्रास केला जात आहे .मात्र ज्यांची ही वाफेच्या मशीन घ्यायची इच्छा आहे परंतु आर्थिक अडचण होत असल्यामुळे ती मशीन घेतली जात नाही याच कारणाने भिगवण ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश शेंडगे यांनी गरजू नागरिकांना विनामोबदला पन्नास मशीनचे वाटप केले.

यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शंकराव गायकवाड ,संतोष धवडे सचिन बोगावत, अजिंक्य माडगे प्रशांत शेलार , रामहरी चोपडे , दादासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी बोलताना महेश शेंडगे यांनी सांगितले की वाफ घेण्याचे मशीन चा वापर करून कोरोनाला दूर ठेवता येणार आहे काही अडचणीमुळे ज्यांना कोणाला हे मशीन घेणे शक्य झाले नाही अशा गरजवंतानी भिगवन ग्रामपंचायत येऊन मशीन घेऊन जावे.