भिगवण वार्ताहर .दि.१६
पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले.
पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या परस्परविरोधी तक्रारी मात्र आता हि ओळख पुसण्याचा प्रयत्न चांगल्या कामातून केला जात आहे.पोंधवडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावरून रस्सीखेच चालू होती आणि त्यात बाजी मारत किसन शंकर आटोळे यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब लक्ष्मण ननवरे यांची निवड करण्यात आली.अध्यक्षपदी निवड होताच आटोळे यांनी मानाचा मोठे पणा दाखवीत गेल्या अनेक दिवसापासून पडलेले प्रवेशद्वार स्वखर्चाने तयार करून बसवून दिले .या साठी त्यांना उपाध्यक्ष ननवरे यांनी मदतीचा हात दिला.या प्रवेशद्वाराचे उद्घाटन वेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर ,सरपंच लक्ष्मण पवार ,प्रदीप बंडगर ,गणेश पवार माजी सरपंच नानासाहेब बंडगर ,मदनवाडी सोसायटीचे चेअरमन विष्णुपंत देवकाते ,ग्रामपंचायत सदस्य डॉ.तुळशीराम खारतोडे ,भागवत बंडगर ,बाळासाहेब ननवरे ,शिक्षक आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.