भिगवण वार्ताहर. दि. 8
आपल्याच उदरी जन्म घेतलेल्या दोन निष्पाप मुलांचा गळा दाबून जीव घेतल्यावर नवऱ्यावर धारदार शस्त्राने वार गंभीर जखमी केल्याची घटना दौड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात घडली. गंभीर जखमी नवऱ्यावर बारामती येथे उपचार. संशयित आरोपी महिलेला दौड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावामधून शनिवारी सकाळीच धक्कादायक बातमी समोर आली आहे.जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्यांचा आज पहाटे गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.सदर महिला एवढ्यावरच न थांबता आपल्या पतीवर देखील तिने कोयत्याने वार केलेत.तिच्या या क्रूर वागण्यातून तीला पूर्ण कुटुंबच संपवायचं होत काय असा सवाल उपस्थित होतो.यात पती ही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती बारामती येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून दौंड पोलिसांनी संशयित आरोपी कोमल दुर्योधन मिंढे य(वय 30) या महिलेला अटक केली आहे.
शंभू दुर्योधन मिंढे (वय ०१) आणि पियू दुर्योधन मिंढे वय (०३)अशी मयत मुलांची नावे असून या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय ३५) वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केल आहे. कौटुंबिक कलहातुन या जन्मदात्या क्रूर आईने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्तीवर पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून ही घटना समजताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.संशयित आरोपी महिला दौड पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.