भिगवण वार्ताहर. दि. 22
भिगवण बारामती रोडवर लामजे वाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे कोल्ह्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार कोल्हा पाण्याचा शोध घेत असताना लामजेवाडी येथील वळणावर अज्ञात वाहणाची ठोकर लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला असावा.बारामती भिगवण रोडचे नूतनीकरणाचे काम सुरु असून याठिकाणी वाहणांचा वेग जास्त असतो.याचं वेळी पाण्याचा शोध घेत असताना हा अपघात घडला असून यात कोल्ह्याचा डोक्याच्या भागाला गंभीर जखमा होऊन यात त्याचा मृत्यू झाला.सदर कोल्हा मादी जातीचा असावा आणी त्याच्या पोटाच्या स्थितीवरून गर्भवती असण्याची शक्यता माहितीतील नागरिकाने दिली.याबाबत बारामती वन विभागाच्या अधिकारी शुभांगी लोणकर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.याची माहिती वनविभागाच्या टोल फ्री मदत केन्द्र येथे देण्यात आली आहे.