भिगवण वार्ताहर .दि. 16
भिगवण पोलीस स्टेशनचे महिना भरापूर्वी आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांची तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी स पो नी विनोद महांगडे यांनी चार्ज घेतल्याची माहिती मिळत आहे.तर भिगवण येथे सिंघम अधिकारी म्हणून नाव असणाऱ्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बारामती वाहतूक विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
लोक सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.यात भिगवण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी दिलीप पवार यांच्या जागी संदेश बावकर यांची तर दौंड पोलीस निरीक्षक पदी चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती करण्यात आली होती. यादव यांनी दीड महिन्याच्या काळात आपला जलवा दाखवीत अनेक गुन्ह्यांची उकलं केली होती.तर अनेक समाज कंठकाच्या मुसक्या आवळीत कायदा आणी सुव्यवस्था आबादीत राहावी यासाठी कामकाज सुरु केले होते.तर अनेक वर्षापासून बिघडलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कार्यवाही सुरु केली होती.मात्र काही राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधामुळे किंवा नुकत्याच कुरकुंभ येथील ड्रग कारवाई मुळे ? त्यांची तातडीने बदली करण्यात आली होती .यादव यांच्या अचानक झालेल्या बदलीला दौंड कर जनतेने विरोध दर्शवीला होता.मात्र नुकतीच त्यांची बदली बारामती वाहतूक निरीक्षक पदी नियुक्ती झाल्यामुळे बारामती येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास त्यांचा फायदा होईल.
तर भिगवण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी संदेश बावकर यांनी भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील अफूची शेती कारवाई तसेच अनेक फरारी आरोपीना जेरबंद करीत आपल्या कामकाजाची चुणूक दाखविण्यास सुरवात केली होती.त्यांनी नुकतीच हॉटेल वर चालणाऱ्या अनैतिक व्यवसायावर कारवाई केली होती.मात्र त्यांची अचानक बदली करण्यात आल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आल्याचे दिसून येत आहे. बावकर यांच्या जागी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विनोद महांगडे यांनी पदभार स्वीकारला आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी संदेश बावकर यांची 45 दिवसात बदली करण्यात आली असल्यामुळं नवीन पदभार स्वीकारलेल्या स पो नी विनोद महांगडे यांच्या समोर भिगवण पोलीस ठाण्यात काम करताना आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
भिगवण येथील वाहतूक कोंडी असेल अथवा शाळा परिसरात असणारी रोड रोमिओ चा बिमोड तसेच शाळा परिसरात दारू आणी तंबाकू सारख्या विषयावर कारवाई असेल तर नव्याने निर्माण होणाऱ्या सोशल मीडिया रिल्स गुंडावर कारवाई करण्याचे आव्हान असेल.तर भिगवण बाजार पेठेत चोरी आणी सामाजिक सलोखा आबादीत राखण्याचे आव्हान असेल.