भिगवण वार्ताहर.दि.१
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सिंघम पोलीस अधिकारी अशी छाप पाडीत महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी वेळ प्रसंगी वज्रापेक्षा कठोर भूमिका बजाविणाऱ्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची दौंड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.तर भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून संदेश बावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वरिष्ठ पदावरील अधिकारी यांच्या राज्यात बदलीचे सत्र सुरु आहे.याच अनुशंघाने भिगवण आणि दौंड येथील प्रभारी अधिकारी यांच्या नव्याने नियुक्ती करण्यात आल्या.भिगवण पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत असताना चंद्रशेखर यादव यांनी सर्वसामान्य भिगवण करांच्या मनावर आपल्या कार्याची छाप उमटवली होती. स्थानिक गुन्हेगारी मोडीत काढीत गुन्हेगारांना कायद्याचा वचक बसविण्याचे काम केले होते.तर महिला आणि मुलीना आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण होण्यासाठी रोड रोमिओच्या मुसक्या आवळीत सुता सारखे सरळ करण्यासाठी पोलीस दलाचा वापर केला होता.तर सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाला पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक देण्याचे काम केले होते.प्रभारी कार्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर बदली झाल्या नंतरही बदली रद्द व्हावी यासाठी अनेक नागरिक आणि व्यापारी तसेच महिला भगिनीनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.याच सिंघम पोलीस अधिकारी यांची अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्यातून दौंड येथे बदली करण्यात आली.त्यांच्या बदलीचे दौंडकर नागरिक आणि भिगवण कर नागरिकांनी स्वागत केले.तसेच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्या जागी यवतचे संदेश चंद्रकात बावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बावकर यांच्या समोर भिगवण येथील गुन्हेगारी आणि वाहतुकीची कोंडी सुधारण्याचे तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि महिला मुलीना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करण्याचे आव्हान असेल.