निंबोडी येथे 50 लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन ; नवनिर्वाचित सरपंच संतोष सोनवणे यांचा विकासाचा चौकार

0
379

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामे .

बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

.

भिगवण वार्ताहर .दि. 9
बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे गुरुवारी (ता:०४) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर व सरपंच संतोष सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
सदर कामातील मुस्लिम कब्रस्तान बांधकाम, सुतारवस्ती रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण, तुकायवाडी सिमेंट गटर लाईन करणे, ग्रामपंचायत शुशोभीकरण, फडतरेवस्ती रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे अश्या विविध ५० लाख रुपये निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच संतोष सोनवणे यांनी अजित पवार यांच्या निधीतून तसेच संभाजी होळकर यांच्या मदतीने गावातील मंजूर झालेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच गावातील ३६ चारीला खडकवासलाचे वर्षातून ३ आर्वतन मदनवाडी तलावामध्ये सोडल्याने पाणी प्रश्न मार्गी लागेल. ४० चारीची दुरुस्ती करून देखील पाणी सोडण्यात यावे. तसेच जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या सुशोभिकरण करण्यासाठी देखील निधी मिळण्याची मागणी सरपंच संतोष सोनवणे यांनी केली.

यावेळी संभाजी होळकर यांनी निंबोडी सरपंच संतोष सोनवणे यांनी मागणी केलेली कामे अजित पवार यांच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी शिवाजी काळे, ग्रामपंचातीचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here