रोटरी क्लब ऑफ भिगवण च्या माध्यमातून विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मूठभर धान्य जमा करीत वाटला आभाळाएवढा आनंद

0
308

एक् मुठ धान्य गरजावंतासाठी जमवून चिमुकल्या नी घेतला दातृत्वाचा वसा

सत्यवार्ता वार्ताहर : दि. 23

विद्या प्रतिष्टानच्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीअम स्कूल, चिंचोली येथील रोटरी इंटरॅक्ट क्लब आयोजित ‘एक मूठ धान्य’ या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजातील संवेदनशीलता अजूनही टिकून आहे व ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे हे दाखवून दिले आहे. या उपक्रमात शाळेतील मुलांनी व पालकांनी सढळ हाताने एकूण १३ पोते धान्य जमा केले. यात गहू, तांदूळ, बाजरी व ज्वारी या धान्याचा समावेश आहे. हे जमा केलेले धान्य गोविंद वृद्धाश्रम, टेंभुर्णी यांच्या संचालकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजीत भोंगळे यांनी शाळेतील मुलांना सामाजिक बांधिलकी जपता यावी व गरजूंना मदत मिळावी, या उद्देशाने रोटरी क्लब व शाळेतील इंटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक मूठ धान्य’ हा उपक्रम राबवला असल्याचे सांगितले.


या उपक्रमाच्या माध्यमातून दान केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दातृत्त्वाची भावना वाढीस लागावी व त्यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हा उद्देश सफल झाला.रोटरी क्लब भिगवन अनेक सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज भाई शेख यांनी सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सचिन शेठ बोगावत यांनी रोटरीच्या संकल्पनेतून 7 वर्षांपासून हा उपक्रम राबवीला जात असून समाजातील इतरही सामाजिक संस्थांनी राबवला तर अनाथ गोरगरीब लोकांना फार मोलाची मदत होईल असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब चे एजी संजय खाडे नूतन अध्यक्ष संतोष सवाने तसेच भिगवण रोटरी सदस्य उपस्थित होते.इंट्रकट क्लब समन्वयिका अर्चना जानकर व मोहिनी गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here