भिगवण वार्ताहर.दि.२४
पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज नंबर १ हद्दीत सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या ट्रॅकटर ट्राली पाठीमागून धडक दिल्याने घडलेल्या अपघात ट्रॅकटर ड्रायव्हर सह सर्विस रस्त्याने जाणार्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.एसटी ड्रायव्हरच्या सुसाट वेगाचे अनेक बळी जात असताना महामार्ग पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळ मात्र ड्रायव्हरच्या चुकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डाळज गावचे सरपंच अमित जाधव यांनी केला आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र रावसाहेब जगताप वय.३१ रा.डाळज १ ,आबा करे रा.एकशिव ता.माळशिरस जि.सोलापूर असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीची नावे आहेत.तर एसटी बस मधील 25 प्रवाशी यात जखमी झालेले असून त्यांच्यावर जवळच्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत.याबाबत भिगवण पोलिसांनी विनायक सोपान गायकवाड रा.काझी कारबस ता.अक्कलकोट या बस ड्रायव्हर वर त्याचे चुकीमुळे अपघात घडल्याचा गुन्हा नोंद केला आहे.पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या ट्रॅकटर ट्राली ला एस.टी बस नंबर एम.एच.१३ सी.यु.८१२५ या बस ने पाठीमागून भरधाव वेगात धडक दिल्याने हा अपघात घडला.हि धडक इतकी जोराची होती कि यामुळे हवेत उडालेल्या ट्रोली खाली सर्विस रस्त्याने आपल्या कामावरून घरी जाणाऱ्या रवींद्र जगताप यांच्या दुचाकी एम.एच.४२.बी.एच.९७०७ वर येवून धडकली.यात जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.तर बस ड्रायव्हरला गाडी ताब्यात न राहिल्याने इलेक्ट्रिक पोलवर बस आदळली. तर यात ट्रॅकटर ड्रायव्हर आबा करे यांचाही जागीच मृत्यू झाला.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात निलेश रामदास कोळी यांनी फिर्याद दिली आहे.अपघाताचा तपास पोलीस उप निरीक्षक जाधव करीत आहेत.
पाठीमागील काही दिवसापासून पुणे सोलापूर महामार्गावर एसटी बसचे सुसाट वेगामुळे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहेत.भिगवण बस स्थानकातून निघून १०० मीटर अंतरावर असाच दोन चालकांत लागलेल्या स्पर्धेमुळे एकाला आपला जीव गमवावा लागला होता.मात्र ब्रेकफेल चे नाटक ड्रायव्हरने करून यातून सुटका करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला होता.आजच्या अपघातात बस च्या ड्रायव्हर मद्य प्राशन केली असल्याची शक्यता अनेक नागरिकांनी वर्तविली आहे.मात्र या ड्रायव्हरला कोणी तरी जाणूनबुजून अपघात स्थळावरून पळून जाण्यासाठी मदत केली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पुणे सोलापूर महामार्गांवर अपघात घडल्याचे समजताच आपुलकीची जागा ऍम्ब्युलन्स सर्व्हिस संचालक केतन वाघ ऋषिकेश वाघ यांनी तातडीने धाव घेत सर्व जखमीना उपचारासाठी दाखल केले.या अपघातात जवळपास 25 प्रवासी जखमी झाले होते तर घाबरल्यामुळे काहींची अवस्था गंभीर झाली होती.मात्र टोल वसुल करणाऱ्या कंपनीने कोणतीही सुविधा पोहोचवली नाही.त्यामुळे केतन वाघ आणी ऋषिकेश वाघ यांचे सर्व स्तरातून कॊतुक केले जात आहे..